AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, मोठा प्लेयर बाहेर, अचानक ‘या’ खेळाडूची निवड

IND vs ENG | भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. याची सुरुवात 25 जानेवारीला होईल. 11 मार्चपर्यंत ही सीरीज खेळली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजसाठी जो संघ निवडलेला त्यातल्या बहुतांश खेळाडूंना पहिल्या दोन टेस्टसाठी संधी देण्यात आलीय.

IND vs ENG | टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, मोठा प्लेयर बाहेर, अचानक 'या' खेळाडूची निवड
ind vs eng test seriesImage Credit source: BCCI
| Updated on: Jan 13, 2024 | 8:00 AM
Share

IND vs ENG | इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी सुरुवातीच्या दोन टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने शुक्रवारी 12 जानेवारीच्या रात्री पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी 16 सदस्यीय स्कवॉडची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जे खेळाडू टीमचा भाग होते, त्यातल्या बहुतांश खेळाडूंची इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेक्शन कमिटीने सर्वांनाच धक्का देत उत्तर प्रदेशचा विकेटकीपर ध्रुव जुरैलची टीम इंडियात निवड केली आहे. तो पहिल्यांदा ड्रेसिंग रुमचा भाग असेल.

भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. याची सुरुवात 25 जानेवारीला होईल. 11 मार्चपर्यंत ही सीरीज खेळली जाणार आहे. हा मोठा दौरा असल्याने बीसीसीआयने पहिल्या दोन टेस्टसाठीच टीम निवडली आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीला हैदराबादमध्ये खेळला जाईल. दुसरी टेस्ट मॅच 2 फेब्रुवारीला विशाखापट्टनममध्ये होणार आहे.

मोहम्मद शमीला का नाही निवडलं?

सीनियर सिलेक्शन कमिटीने दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीजमधील बहुतांश खेळाडूंना संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत डेब्यु करणारा प्रसिद्ध कृष्णा आणि ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर यांना ड्रॉप केलय. दोघांनी दक्षिण आफ्रिकेत अपेक्षित प्रदर्शन केलं नाही. मोहम्मद शमी अजूनही पूर्ण फिट नाहीय, त्यामुळे त्याला निवडलेलं नाही. तो तिसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाचा भाग असू शकतो.

त्याला नाहीच निवडलं

इशान किशनला टीम इंडियात स्थान मिळणार की, नाही? याकडे लक्ष होतं. मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधून त्याने आपल नाव मागे घेतलं होतं. इशानने मानसिक थकव्याच कारण देऊन ब्रेक घेतला होता. त्याला अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी सुद्धा निवडलं नाही. निदान त्याला टेस्टसाठी संधी मिळेल अशी अपेक्षा होती.

पहिल्या-दुसऱ्या टेस्टसाठी स्क्वॉड

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.

भारत-इंग्लंड टेस्ट सीरीज

25-29 जानेवरी : पहिली टेस्ट, हैदराबाद

2-6 फेब्रुवारी : दूसरी टेस्ट, विशाखापट्टनम

15-19 फेब्रुवारी : तीसरी टेस्ट, राजकोट

23-27 फेब्रुवारी : चौथी टेस्ट, रांची

7-11 मार्च : पाचवी टेस्ट, धर्मशाला

दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.