IND vs AFG Playing 11 | अफगाणिस्तानविरूद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग 11, विराट कोहलीच बाहेर

ind vs afg 1ST t20- टीम इंडिया आणि अफगाणिस्तान पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या. विराट कोहसी पहिल्या सामन्यात नसल्याने टीम मॅनेजमेंटसाठी निर्णय घेणं सोपं झालं आहे.

IND vs AFG Playing 11 | अफगाणिस्तानविरूद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग 11, विराट कोहलीच बाहेर
Team India Playing 11 against Afganistan first t20 match
| Updated on: Jan 11, 2024 | 3:52 PM

मुंबई : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज 11 जानेवारीला मोहालीमध्ये पार पडणार आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा याच्याकडे संघाची धुरा असणार आहे. पहिला सामन्यात आज कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विराट कोहली पहिला टी-20 सामना खेळणार नसल्याने ओपनिंगची जाडी फिक्स झाली आहे.  टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे यशस्वी जयस्वाल आण शुबमन गिल यांची जागा पक्की मानली जात आहे. कारण जर विराट कोहली असता तर शुबमन गिल आणि रोहित शर्मा सलामीला आले असते. तिसऱ्या नंबरला विराट आला असता मात्र आजच्या सामन्यात  विराट नसल्याने जयस्वाल आणि रोहित ओपनिंग करतील.

तिलक वर्मा चौथ्या स्थनी असणार असून कीपर म्हणून रोहित संजू की जितेश शर्मा कोणाची निवड होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऑल राऊंडर म्हणून अक्षर पटेल असणार असून फिनिशर रिंकू सिंग असणार आहे. या मालिकेमध्ये टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा मुकेश कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांच्याकडे असणार आहे. तर स्पिनर्स म्हणून कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई यांची वर्णी लागणार आहे.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11 जाणून घ्या

रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन/ जितेश शर्मा (WK), अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, मुकेश कुमार

टीम इंडिया संपूर्ण स्क्वॉड

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.