TMC Election 2026 : ठाण्यात मोठ्या घडामोडी, स्थानिक भाजपची धक्कादायक भूमिका, शिवसेनेला झटका
TMC Election 2026 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. महायुतीने महापालिका निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ठाण्यात स्थानिक भाजपने धक्कादायक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ही युती होणार की नाही?

शिवसेना आणि भाजप पक्षाची युती व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये बैठक झाली होती. मात्र ठाण्यात युतीमध्ये मतभेद दिसून येत आहेत. ठाण्यातील भाजप मंडळ अध्यक्ष यांनी एकत्रितपणे ठाण्यात युती नको म्हणून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र दिलं आहे. ठाण्यात शिवसेनेसोबत भाजप पक्षाची युती नको यासंदर्भात रवींद्र चव्हाण यांची ठाण्यातील मंडळ अध्यक्ष यांनी भेट घेतली. युती नको या संदर्भात कालच मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी भाजप आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांना दिले होते निवेदन.
ठाण्यात युती नको म्हणून भाजप मंडळ अध्यक्ष यांनी वरिष्ठांकडे मागणी केली होती. तर आता शिवसेनेमध्येच अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मनोरमा नगर प्रभाग क्रमांक तीन ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी हवा अशी शिवसेना आणि पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. उमेदवार स्थानिक असावा अशी शिवसेना शाखा प्रमुख देवानंद भगत, विक्रांत वायचाळ यांची मागणी. प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक भूषण भोईर, मधुकर पावशे यांना स्थानिकांचा आणि शिवसैनिकांचा प्रत्यक्षपणे विरोध. माजी महापौर मीनाक्षी शिंदे या देखील याच प्रभागातील आहेत. मीनाक्षी शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांना स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक देणार पत्र.
संजय कदम यांची 50 टक्के जागांची मागणी
सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीची चर्चा जागा वाटपावरून रखडली. शिवसेना शिंदे गटाकडून पन्नास टक्के जागांची मागणी. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम यांची 50 टक्के जागांची मागणी. “सोलापुरात युती न झाल्यास स्वबळावर लढण्यास आम्ही सक्षम आहोत. सोलापूर महापालिकेतील युतीच्या चर्चेसाठी 102 पैकी 51 जागांची मागणी आम्ही करतोय. सोलापूर मध्ये आमच्या पक्षाकडे एका प्रभागात 15 ते 20 इच्छुक उमेदवार आहेत” असं शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख संजय कदम म्हणाले. शिवसेना-भाजपने महापालिका निवडणुका युतीमध्ये लढवायच्या ठरवलं आहे.
