AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयचोरीची एक दोन नाही तर 65 प्रकरणं..! अंडर 19 क्रिकेटमध्ये नेमकं काय सुरू आहे? धक्कादायक बनाव समोर

क्रिकेट खेळण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. पण गेल्या काही वर्षात वयचोरी ही बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरली आहे. दुसरीकडे बंगाल क्रिकेट असोसिएशनने 65 खेळाडूंवर बंदी घातली आहे. यात वयाचं अंतर पाहिला तर आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

वयचोरीची एक दोन नाही तर 65 प्रकरणं..! अंडर 19 क्रिकेटमध्ये नेमकं काय सुरू आहे? धक्कादायक बनाव समोर
वयचोरीची एक दोन नाही तर 65 प्रकरणं..! अंडर 19 क्रिकेटमध्ये नेमकं काय सुरू आहे? धक्कादायक बनाव समोरImage Credit source: Getty Images
| Updated on: Sep 04, 2026 | 4:39 PM
Share

65 Bengal Cricketers Banned in Age Fraud: क्रिकेटपटू राहुल यादव याने वयचोरी केल्याचं प्रकरण ताजं आहे.  बीसीसीआयने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. असं असताना बंगाल क्रिकेट असोसिएशनने वयचोरी प्रकरणी एक दोन नाही तर 65 खेळाडूंवर बंदी घातली आहे. सीएबीच्या तपासात एकूण 65 खेळाडूंच्या रजिस्ट्रेशन आणि ट्रान्सफरवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे 65 क्रिकेटपटूंना आगामी दोन पर्वात म्हणजे देशांतर्गत 2026-27 आणि 2027-28 सिझनमध्ये खेळता येणार नाही. यात बंगालकडून एज ग्रुपचे 12 क्रिकेटपटू आहेत. त्यांच्या जन्म तारखेत काही वर्षांचं अंतर दिसून आलं आहे, त्यामुळे क्रीडाप्रेमी आश्चर्यचकीत झाले आहेत. यात भारताकडून 2022 मध्ये अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणारे वेगवान गोलंदाज रवि कुमार आणि फिरकीपटू रोहित यादव यांचं नाव आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज रवि कुमारने 2022 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने इंग्लंडविरुद्ध अंतिम फेरीत 34 धावा देऊन 4 विकेट काढल्या होत्या. त्याने या स्पर्धेच्या सहा सामन्यात 10 विकेट काढल्या होत्या.

सीएबीच्या अधिकृत रेकॉर्डनुसार, रवि कुमारच्या जन्म प्रमाणपत्रानुसार 45 महिन्याचं अंतर आहे. हे बनावट प्रकरण 2021-22 पासून 2025-26 मध्ये दिसून आलं आहे. अंडर 19, अंडर 23 आणि वरिष्ठ संघातील सहभाग अवैध मानला गेला आहे. असंच काहीसं रोहित यादवच्या बाबतीत आहे. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत खेळलेल्या रोहित यादवने वयचोरी केली होती. त्यामुळे त्याच्यावरही दोन वर्षांची बंदी घातली आहे. या प्रकरणानंतर बीसीसीआये सर्व राज्याच्या बोर्डांना अलर्ट दिला आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या यादीत एज ग्रुपच्या 12 क्रिकेटपटूंचा रेकॉर्ड आश्चर्यकारक आहे. अरुण कुमार चौरासियाच्या वयात 115 महिन्यांचा अंतर दिसून आलं आहे. हे अंतर 9.5 वर्षांचं आहे. दुसरीकडे महिपाल यादवच्या वयात 8 वर्षांचा बनाव दिसून आला आहे. प्रभात मोर्चाच्या वयात 57 महिन्यांचं अंतर, अमृत राज उपाध्यायच्या वयात 48 महिन्यांचा, दिलशाद खानच्या वयात 46 महिन्यांचा, अनुभव त्यागीच्या वयात 36 महिन्यांचा, कुणाल कुमारच्या वयात 35 महिन्यांचा, विनीत मौर्याच्या वयात 32 महिन्यांचा, कुशल गुप्ता यांच्या वयात 26 महिन्यांचा आणि परमित सिंहच्या वयात 12 महिन्यांचा फरक आहे.

Follow Us
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल