नाकातून रक्त येत राहिलं, तरीही रोहितनं नाही सोडलं मैदान

| Updated on: Oct 03, 2022 | 5:56 PM

कालच्या सामन्यात रोहित शर्मानं आपल्या समर्पणानं सर्वांची मने जिंकली.

नाकातून रक्त येत राहिलं, तरीही रोहितनं नाही सोडलं मैदान
रोहित शर्मा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) तीन सामन्यांच्या T20 मालिकेत भारतानं 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलीय. प्रथम फलंदाजी करताना भारतानं (Team India) 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला केवळ 221 धावा करता आल्या आणि 16 धावांनी सामना गमावला. यावेळी भारतानं केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय.

चौघांचं मोठं योगदान

टीम इंडियाच्या या विजयात भारताच्या पहिल्या चार फलंदाजांनी मोठं सर्वाधिक योगदान दिलंय. रोहित, राहुल, विराट आणि सूर्यकुमार यांनी शानदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेसमोर 200 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवलंय. यानंतर आफ्रिकन संघाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.

कालच्या सामन्यात रोहित शर्मानं आपल्या समर्पणानं सर्वांची मने जिंकली. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ गोलंदाजी करत होता आणि त्याच दरम्यान रोहितच्या नाकातून रक्त येऊ लागले. हिटमॅननं मैदान सोडलं नाही. तो टॉवेलनं नाक पुसत गोलंदाज हर्षल पटेलला सूचना देत राहिला. त्याच्या समर्पणानं सर्वांची मनं जिंकलीय.

हा व्हिडीओ पाहा

या सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी केली. त्यानं 28 चेंडूत 49 धावा केल्या. कोहलीने 19 षटकांत 49 धावा दिल्या होत्या. 20व्या षटकात कार्तिकनं मोठे फटके खेळायला सुरुवात केली.

कोहलीशी संवाद साधला आणि त्याला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी स्ट्राइक करायला आवडेल का, असं विचारलं. यावर कोहलीनं त्याला हातवारे करत सांगितलं की, तू मोठे फटके खेळत राहा.

विराटनं अर्धशतकही केलं नाही. यावेळी त्याने टीमला अधिक महत्व दिलं. संघाप्रती असलेल्या समर्पित भावनेनं सर्वांची मने जिंकली.

या सामन्यात दिनेश कार्तिकनं शानदार फलंदाजी केली. त्यानं सात चेंडूंत 17 धावा केल्या. यादरम्यान, डावाच्या शेवटच्या षटकात त्याने षटकार ठोकला.

त्याच्या षटकाराने त्याला निदाहस ट्रॉफीची आठवण करून दिली. निदाहस ट्रॉफीमध्येही त्याने याच शैलीत षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत भारताने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 237 धावा केल्या.