दीप्ती शर्मावर टीका करणारे आता दीपकचं कौतुक करणार का? व्हिडीओ पाहून ठरवा

जे दीप्ती शर्मानं केलं ते दीपक चहरनं नाही केलं, आता तुमची काय प्रतिक्रिया असणार?

दीप्ती शर्मावर टीका करणारे आता दीपकचं कौतुक करणार का? व्हिडीओ पाहून ठरवा
दीप्ती शर्मावर टीका करणारे आता दीपकचं कौतुक करणार का?
Image Credit source: social
| Updated on: Oct 04, 2022 | 11:21 PM

नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) आज टी 20 (T20) सीरीजमधला शेवटचा सामना सुरु आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं तीन गड्यांच्या मोबदल्यात 227 धावा केल्या आहेत. ही बातमी लिहेपर्यंत टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाली होती. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहरकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सला धावबाद करण्याची संधी होती. तो संघाला विकेट मिळवून देऊ शकला असता. पण, त्यानं तसं केलं नाही. त्यामुळे आता दीप्ती शर्मावर टीका करणारे दीपक चहरचं कौतुक करणार का, असाही प्रश्न विचारल्या जातोय.

स्टब्स नॉन स्ट्राइकवर येऊनही धावबाद झाला नाही. त्यामुळे आता दीप्ती शर्मावर टीका करणाऱ्यांनी दीपकचं कौतुक केलं पाहिजं, असं सोशल मीडियावर बोललं जातंय.

नेमकं काय घडलं?

दीपक चहरने भारतासाठी 16वं षटक आणलं आणि तो चेंडू टाकणार होता. परंतु त्याची नजर नॉन स्ट्राइकवर उभ्या असलेल्या ट्रिस्टन स्टब्सवर होती. यानं नॉन-स्ट्राइक सोडले होते. दीपक चहर थांबला आणि त्यानं चेंडू स्टंपवर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू स्टंपला लागला नाही आणि त्याला इशारा दिला. यानंतर ट्रिस्टन स्टब्सनं तसं केलं नाही. कारण त्याला माहित होतं की यावेळी दीपक चहर चूक करणार नाही. कारण त्यानं इशारा दिलाय.

हा व्हिडीओ पाहा

दीपकनं केलं नाही ते दीप्तीनं केलं

दीप्ती शर्मानं इशारा दिल्यानंतर इंग्लंडचा फलंदाज चार्ली डीनला नॉन स्ट्राइकवर धावबाद केल्यावर तिच्यावर टीका झाली. अशा परिस्थितीत दीपक चहरचं कौतुक होत आहे. मात्र,  नंतर दीपक चहरनं ट्रिस्टन स्टब्सला आर अश्विनच्या हाती झेलबाद केलं.

दीपक चहरनं झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेतील सामन्यातही असेच केले होते. तिथंही त्यानं सलामीवीराला इशारा दिला आणि चेंडू यष्टींसह आदळला.