IND vs ENG: Rohit Sharma ओरडला, भितीने ‘तो’ थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन लपला

IND vs ENG: मोठ्या मनाच्या रोहितने त्याला पुन्हा बोलावलं

IND vs ENG: Rohit Sharma ओरडला, भितीने तो थेट ड्रेसिंग रुममध्ये जाऊन लपला
Rohit-sharma
Image Credit source: Screengrab
| Updated on: Nov 08, 2022 | 5:09 PM

एडिलेड: टीम इंडियाचा मैदानाबाहेरील हिरो रघु राघवेंद्र मंगळवारी एडिलेडमध्ये अडचणीत आला होता. प्रॅक्टिस सेशन सुरु असताना तो ड्रेसिंग रुममध्ये लपून बसला होता. रोहित शर्माला टाळण्यासाठी तो हे सर्व करत होता. रोहितला आज रघुच्या थ्रो डाऊनचा फटका बसला. रघु राघवेंद्र टीम इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट आहे. रघुने केलेला शॉर्ट पीच थ्रो आज रोहितच्या उजव्या मनगटाच्या वर लागला.

सर्वचजण टेन्शनमध्ये आले होते

इंग्लंड विरुद्धच्या महत्त्वाच्या सेमीफायनल मॅचआधी रोहितला दुखापत झाल्याने सर्वचजण टेन्शनमध्ये आले होते. रघुचा थ्रो बसल्यानंतर रोहितने रागाच्या भरात चांगलच सुनावलं. वेदनेने विव्हळत असलेल्या रोहितने तात्काळ बॅट खाली टाकली.

आधी यॉर्कर टाकला

थ्रो डाऊनमध्ये रघु रोहितला वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकत होता. त्याने आधी यॉर्कर टाकला नंतर शॉर्ट पीच टाकला. यॉर्कर लेंग्थ चेंडूनंतर रघुने शॉर्ट पीच बॉल टाकला. हाच बॉल रोहितच्या मनगटाला लागला.

टीमचे फिजियो कमलेश जैन यांनी दुखापतीची तपासणी केली. ते प्रॅक्टिस एरियाजवळच उभे होते. रोहितला खुर्चीवर बसवण्यात आलं. दुखापत झालेल्या भागावर आईस-पॅक लावण्यात आला. सपोर्ट स्टाफच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. बॅटिंग कोच विक्रम राठोर यांनी स्वत: दुखापतीची पाहणी केली. 40 मिनिटानंतर रोहित शर्मा पुन्हा एकदा फलंदाजीसाठी नेट्समध्ये उतरला.

मिक्सिंग म्हणजे काय?

मिक्सिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू टाकल्याने रोहित रघुवर वैतागला. मॅचमध्ये वेगवान गोलंदाज एकाच प्रकारचे चेंडू टाकत नाही. त्यात वैविध्य असतं. प्रॅक्टिस सेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूचा सराव दिला जातो.
रोहितने रघुला लेंग्थ डिलिव्हरी टाकायला सांगितली होती. तो शॉर्ट पीच थ्रो डाऊनसाठी तयार नव्हता. त्यामुळे त्याला दुखापत झाली.

त्यावेळी रोहितने विचारलं की….

रोहित बरा होऊन खेळपट्टीवर आल्यानंतर त्याला रघु कुठे दिसला नाही. दयानंद गारानी यांनी रोहितला थ्रो डाऊनचा सराव दिला. त्यावेळी रोहितने रघु कुठे आहे? म्हणून विचारलं.

दिनेश कार्तिकने समजावलं

रोहितचा ओरडा पडल्यानंतर तो आतमध्ये जाऊन बसलाय असं टीम इंडियाने बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी सांगितलं. रोहितने रघुल नेट्समध्ये बोलवायला सांगितलं. रघु नेट्समध्ये येत असताना खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने त्याला जोरदार चियर केलं. त्यानंतर काय चूक केली, ते दिनेश कार्तिकने रघुला समजावलं.