Tilak Verma : ही दोस्ती तुटायची नाय! बेबी एबीच्या डेब्यूनंतर तिलक वर्मा भावूक, पाहा व्हिडीओ

Dewald Braevis : ब्रेविसने डेब्यू केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा भावूक झालेला दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे

Tilak Verma : ही दोस्ती तुटायची नाय! बेबी एबीच्या डेब्यूनंतर तिलक वर्मा भावूक, पाहा व्हिडीओ
| Updated on: Aug 31, 2023 | 9:50 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविस याने टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये ब्रेविस मुंबई इंडिअन्स संघाकडून खेळतो त्याने बुधवारी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टी-20 मध्ये डेब्यू केला. ब्रेविसने डेब्यू केल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू तिलक वर्मा भावूक झालेला दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ तिलकचा सहकारी खेळाडू सूर्यकुमार यादव याने गुपचूप काढला.

पाहा व्हिडीओ-

 

तिलक वर्मा आणि सूर्या आशिया कपसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहेत. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्ह ब्रेविसला डेब्यू कॅप दिली जात असते. तेव्हा तिलक हा टीव्हीसमोर उभा असलेला पाहायला मिळाला आहे. तिलक वर्मा आणि सूर्या आशिया कपसाठी श्रीलंका दौऱ्यावर आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेव्ह ब्रेविसला डेब्यू कॅप दिली जात असते. तेव्हा तिलक हा टीव्हीसमोर उभा असलेला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमार यादव याने काढलेला व्हिडीओ मुंबई इंडिअन्सने इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. मुंबईकडून खेळताना दोघांनी सामने जिंकून दिले आहेत.

तिलक आणि ब्रेविस चांगले दोस्त असून एकमेकांप्रती असलेलं प्रेम दिसून आलं. तिलकनेही वेस्ट इंडिज दौऱ्यावर पदार्पण केलं होतं. पठ्ठ्याला एका दौऱ्यावर दोन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळालेली. टी-20 मध्ये त्याने छाप पाडली होती मात्र त्याला वनडे क्रिकेटमध्ये खास काही करता आलं नाही. मात्र आशिया कपमध्येही तिलक वर्मा याला संघात स्थान देण्यात आलं आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत होणार आहे. या सामन्यामध्ये तिलकला संघात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिलकचा व्हिडीओ सोशळ मीडियावर चांगला व्हायरल झालाय.

Follow Us