संजू सॅमसनने क्रिकेट सोडलं? फुटबॉल टीमकडून मोठी जबाबदारी

| Updated on: Feb 07, 2023 | 12:00 AM

अनेकवेळा संजूकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे मात्र हार मानेल तो संजू कसला. निवड समितीला आपल्या नावाचा विचार करण्यासाठी भाग पाडणाऱ्या संजू सॅमसनच्या शिरपेचात मानााचा तुरा रोवला गेला आहे.

संजू सॅमसनने क्रिकेट सोडलं? फुटबॉल टीमकडून मोठी जबाबदारी
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी भारतीय संघाचा खेळाडू संजू सॅमसनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दुखापतीमुळे बाहेर पडलेला संजू पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. अनेकवेळा संजूकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे मात्र हार मानेल तो संजू कसला. निवड समितीला आपल्या नावाचा विचार करण्यासाठी भाग पाडणाऱ्या संजू सॅमसनच्या शिरपेचात मानााचा तुरा रोवला गेला आहे. कसोटी मालिकेआधी संजू सॅमसनकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संजू सॅमसनकडे कोणती जबाबदारी?
‘इंडियन सुपर लीग’ या स्पर्धेतील केरळा ब्लास्टर्स एफसी संघाने संजू सॅमसनला संघाचं ब्रँड एम्बॅसेडरची जबाबदारी दिली आहे. संजू सॅमसनने मैदानावर रेकॉर्ड करून नाहीतर जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Sanju Samson Kerala Blasters FC Brand Ambassador) केरळच्या युवा खेळाडूंसाठी संजू एक प्रेरणा आहे.

लहानपासूनच फुटबॉल हा नेहमीच माझ्या हृदय जवळचा खेळ राहिला आहे. माझे वडिल व्यावसायिक फुटबॉलपटू होते. या क्लबने राज्यातील फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खूप काही केलं आहे. क्लबकडून देण्यात आलेली जबाबदारी स्वीकारली असून खेळ वाढवण्यासाठी मी तयार असल्याचं संजू सॅमसन म्हणाला.

 

दरम्यान, इंडियन सुपर लीगमध्ये केरळ ब्लास्टर्सचा मागील पाच सामन्यांमध्ये संघाला तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.तर दोन सामने जिंकले आहेत.