Team India : टीम इंडियाचंं उपकर्णधारपद म्हणजे ‘साडेसाती’? समोर आली अशी धक्कादायक आकडेवारी

आतापर्यंत झालेल्या दोन T20 सामन्यांमध्ये विंडिजने भारताला पराभूत करुन 5 सामन्यांच्या मालिकेत भारतासमोर 2-0 ची आघाडी घेतली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून एक धक्कादायक आकडेवारी समोर येताना दिसत आहे.

Team India : टीम इंडियाचंं उपकर्णधारपद म्हणजे साडेसाती? समोर आली अशी धक्कादायक आकडेवारी
| Updated on: Aug 07, 2023 | 5:33 PM

मुंबई : भारतीय संघ सध्या विंडिज दौऱ्यावर आहे. आतापर्यंतर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमध्ये भारताने विंडिजला पराभूत करुन मालिका आपल्या नावे केली. मात्र T-20 मालिकेत भारताचे विंडिजसमोर हाल बेहाल होताना दिसत आहेत. आतापर्यंत झालेल्या दोन T20 सामन्यांमध्ये विंडिजने भारताला पराभूत करुन 5 सामन्यांच्या मालिकेत भारतासमोर 2-0 ची आघाडी घेतली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून एक धक्कादायक आकडेवारी समोर येताना दिसत आहे.

या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या फलंदाज आणि गोलंदाजांकडून खराब प्रदर्शन पहायला मिळाले. तर स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव याच्यासह इतर अनेक खेळाडू आउट ऑफ फॉर्म दिसले आहेत. आयसीसीच्या T-20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी असलेला सुर्यकुमार यादव सध्या खराब प्रदर्शन करत असल्याने त्याच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असं असताना त्याच्या फॉर्मचा मेळ त्याच्या उपकर्णधार पदासोबत बांधला जातोय. गेल्या अनेक मालिकांपासून जो भारतीय संघाचा उपकर्णधार झाला आहे त्याने आपला फॉर्म गमावला आहे. फक्त सुर्यकुमारबाबतच याआधी उपकर्णधारपदी निवड झालेल्या खेळाडूंचीही अशीच अवस्था आहे. यामध्ये के.एल. राहुल आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे.

के.एल .राहुल सध्या दुखापतग्रस्त असून तो NCA मध्ये वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे. पण जेव्हा तो संघाचा उपकर्णधार होता तेव्हा त्याचाही फॉर्म खराबच होता. इतकंच नाही तर त्याच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला संघातील स्थानही गमवावं लागलं होतं.

2023 मध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये हार्दिक पंड्याकडे संघाचं उपकर्णधार पद सोपवण्यात आलं होतं. तेव्हाही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. या मालिकेत तोसुद्धा सपशेल फेल गेला होता, दोन मॅचमध्ये त्याने अवघ्या 9 धावा काढल्या होत्या.

दरम्यान, या आकडेवारीमुळे संघाचं उपकर्णधार साडेसाती ठरत तर नाही ना? असा सवाल क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. युवा खेळाडूंवर दडपण असतं मात्र राहुल, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून पाहिलं जातं.