
क्रिकेट चाहत्यांसाठी 2 फेब्रुवारीला मेजवाणी असणार आहे. रविवारी चाहत्यांना 2 अंतिम सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.दिवसातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र साऱ्यांचं लक्ष हे त्याआधी पहिल्या सामन्याकडे असणार आहे. हा पहिला सामना महामुकाबला असणार आहे. अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड कप उंचावण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया या अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील गतविजेता आहे. टीम इंडियाने 2023 साली शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता निकी प्रसाद हीच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडचा धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत पहिल्यांदा फायनलमध्ये धडक दिलीय. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ या स्पर्धेत अजिंक्य आहेत. अर्थात दोन्ही संघांनी या स्पर्धेत खेळलेला एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांसमोर एकमेकांचं आव्हान असणार आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघांची टी 20i वर्ल्ड कप अंतिम फेरीत पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या सीनिअर वूमन्स आणि त्याआधी सीनिअर मेन्स टीम टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली होती. मात्र न्यूझीलंडने वूमन्स दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. तर मेन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात पराभूत करत दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 वूमन्स टीमसमोर टी 20 वर्ल्ड कप अंतिम फेरीत पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे. आता यात दक्षिण आफ्रिकेला यश येतं की टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होतं? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
कोण जिंकणार वर्ल्ड कप?
Who will be crowned #U19WorldCup champions in 2025? ⏳
Final preview 📲 https://t.co/6KQqmCjzwA pic.twitter.com/ChMPy0gMmu
— ICC (@ICC) February 2, 2025
अंडर 19 वूमन्स टीम इंडिया : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके (उपकर्णधार), गोंगडी त्रिशा, मिथिला विनोद, वैष्णवी शर्मा, जोशिता व्ही जे, जी कमलिनी, भाविका अहिरे, सोनम यादव, पारुनिका सिसोदिया, शबनम एमडी शकील, आयुषी शुक्ला, धृती केसरी आणि आनंदिता किशोर आणि ईश्वरी अवसरे.
अंडर 19 वूमन्स दक्षिण आफ्रिका टीम : कायला रेनेके (कर्णधार), जेम्मा बोथा, सिमोन लॉरेन्स, फे काउलिंग, काराबो मेसो (विकेटकीपर), माईके व्हॅन वुर्स्ट, सेश्नी नायडू, लुयांडा नुझा, ॲश्लेग व्हॅन विक, मोनालिसा लेगोडी, न्थाबिसेंग निनी, डायरा लेगोडी, डायरा लेगोडी, न्थॅबिसेंग निनी, डायरा लेगोडी, रेन्सबर्ग आणि चॅनेल वेंटर.