IND vs AUS : टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात 7 धावांनी थरारक विजय, ऑस्ट्रेलियाचा 3-0 ने धुव्वा

India vs Australia 3rd Odi U19 Match Highlights : टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने या विजयासह ऑस्ट्रेलियाचा 3-0 ने धुव्वा उडवला.

IND vs AUS : टीम इंडियाचा तिसऱ्या सामन्यात 7 धावांनी थरारक विजय, ऑस्ट्रेलियाचा 3-0 ने धुव्वा
india vs australia
| Updated on: Sep 26, 2024 | 9:29 PM

अंडर 19 टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने यूथ वनडे सीरिजमधील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 धावांनी थरारक विजय मिळवला. उभयसंघातील हा सामना पुद्देचरी येथे आयोजित करण्यात आला होता. टीम इंडियाने या सामन्यात 50 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 324 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 325 धावांचं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियानेही या धावांचा पाठलाग करत चिवट झुंज दिली. मात्र कांगारुंचे प्रयत्न अवघ्या 7 धावांनी कमी पडले. ऑस्ट्रेलियाला 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 317 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाने अशाप्रकारे हा सामना जिंकत कांगारुंचा 3-0 ने धुव्वा उडवला. तसेच 30 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उध्वस्त केला.

सामन्याबाबत थोडक्यात

ऑस्ट्रेलियाने टॉस टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. साहिल पारख आणि रुद्र पटेल या सलामी जोडीने 34 धावांची भागीदारी केली. साहिल 20 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर रुद्र आणि हरवंश या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. हरवशंने 46 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर रुद्रने 77 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून कॅप्टन मोहम्मद अमान याने 71 धावांची खेळी केली. टीम इंडियाने अशाप्रकारे 324 धावांपर्यंत मजल मारली.

ऑस्ट्रेलियासाठी हा सामना प्रतिष्ठेचा होता. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा सामना जिंकून शेवट गोड करण्याच्या प्रयत्न होता. कांगारुंनी तीव्र प्रतिकार करत शेवटच्या सामन्यापर्यंत लढत दिली. मात्र ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 7 धावा कमी पडल्या. ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 317 धावा केल्या. अशाप्रकारे या सामन्यात एकूण 641 धावा झाल्या. तर 15 विकेट्स पडल्या.

टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यूथ सीरिजमधील कोणत्याही एका एकदिवसीय साम्नयात सर्वाधिक धावांचा हा विक्रम ठरला. यासह 30 वर्षांआधीचा विक्रम मोडीत निघाला. याआधी 1994 साली इंडिया-ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी एकूण 588 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा धमाकेदार विजय

अंडर 19 इंडिया प्लेइंग 11 : मोहम्मद अमान (कर्णधार), रुद्र मयूर पटेल, साहिल पारख, हरवंश सिंग (विकेटकीपर), किरण चोरमले, कार्तिकेय केपी, हार्दिक राज, निखिल, चेतन शर्मा, युधाजित गुहा आणि रोहित सिंग राजावत.

अंडर 19 ऑस्ट्रेलिया प्लेइंग 11 : ऑली पीक (कर्णधार), झॅक कर्टन, सायमन बज (विकेटकीपर), स्टीव्ह होगन, ॲलेक्स ली यंग, ​​ख्रिश्चन हॉवे, एडन ओ कॉनर, ऑली पॅटरसन, थॉमस ब्राउन, लॅचन रानाल्डो आणि हॅरी होकस्ट्रा.