
मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी चारही सामन्यात विजय मिळवला आहे. सुपर सिक्समध्ये आता शेवटचा सामना नेपाळसोबत होत आहे. या सामन्यातील विजय उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणं खूपच गरजेचं आहे. तसेच हा सामना जिंकला तर ग्रुप 1 मध्ये टॉपला राहता येईल. त्यामुळे उपांत्य फेरीत ग्रुप 2 मधील संघाशी सामना होईल. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार उदय सहारन म्हणाला की, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. आम्ही येथे दोन वेळा खेळलो आहोत आणि आम्हाला ही विकेट देखील माहित आहे. आम्ही संघात एक बदल केलेला आहे.”
दुसरीकडे, नेपाळचा कर्णधार देव खनाल याने सांगितलं की, गोलंदाजी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. पण ही खेळपट्टी फलंदाजी चांगली दिसत आहे, आज आम्ही तीन बदल केले आहेत. आम्हाला टॉप ऑर्डरकडू चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. आशा आहे की आज आमच्यात काही चांगली पार्टनरशिप होईल.’
आतापर्यंत भारताने स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे नेपाळला पराभूत करून उपांत्य फेरी गाठेल. तसेच उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तानही उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होईल. तर अंतिम फेरीत भारत पाकिस्तान लढत पाहायला मिळू शकते.
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, सौम्य पांडे, आराध्य शुक्ला
नेपाळ अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): अर्जुन कुमाल, दीपक बोहरा, उत्तम थापा मगर (विकेटकीपर), देव खनाल (कर्णधार), बिशाल बिक्रम केसी, दीपक डुमरे, गुलसन झा, दीपेश कंडेल, सुभाष भंडारी, आकाश चंद, दुर्गेश गुप्ता