Mohit Ulva : ज्याला पाहून पाकिस्तानची उडाली घाबरगुंडी तो ‘मोहित उलवा’ आहे तरी कोण? रविंद्र जडेजाशी कनेक्शन
Who is Mohit Ulva, U-19 Asia Cup Final : अंडर-19 आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. पाकिस्तानने भारतासमोर 338 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. अखेरच्या क्षणापर्यंत हा सामना अत्यंत रोमांचकारी अनुभव बनलेला. या सामन्याला जिंकून देण्यासाठी सर्व टीमचं योगदान असलं तरी मोहित उलवा याच्या नावाची अधिक चर्चा आहे. कारण त्याने शेवटच्या चेंडूवर टीम इंडियाला हा सामना जिंकून दिला आहे.

आज भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठा दिवस आहे. कारण की टीम इंडियाच्या अंडर 19 संघाने आशिया कपचा फायनल मुकाबला जिंकला आहे. हा सामना अतिशय रोमांचक झालेला यावेळी पाहायला मिळाला. सामन्याच्या शेवटच्या बॉलवर टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत केलं आहे, एक गडी राखून भारताने आशिया चषक पटकावला आहे, पण या सामन्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते मोहित उलवा या युवा खेळाडूने. त्याच्या जिद्दीच्या जोरावर भारताने हा रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताला शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता होती. असे असताना मोहितने फोर मारला आणि टीमला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने या सामन्यामध्ये भारतासमोर 338 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं.
पाकिस्तानचं भारतासमोर असंच होतं, असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण भारताचा मेन प्रौढ संघ असो किंवा मग अंडर एज संघ पाकिस्तानची नेहमीच भारतीय टीमपुढे घाबरगुंडी उडते. याही सामन्यामध्ये असाच खेळ झालेला पाहायला मिळाला. मोहित उलवाने देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्याच्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं. आपल्या फलंदाजीतील कौशल्य त्याने वेळोवेळी दाखवलं. दबावाच्यावेळी कशा पद्धतीने खेळायचं हे त्याच्या आजच्या खेळीतून सिद्ध झालं आहे. त्याने खेळलेल्या शेवटच्या चेंडूमुळेच भारताला या थरारक सामन्यात विजय मिळवता आला आहे.
कोण आहे मोहित उलवा? कसा आहे त्याचा प्रवास?
सौराष्ट्रच्या वयोगटातून प्रवास करत मोहित हा अंडर19 संघामध्ये पोहोचला. मोहितने सुरुवातील क्रिडा विश्वात सुरुवात केली तेव्हा तो टेनिस बॉल क्रिकेट खेळत होता. त्याचे वडिल रेल्वे आरपीएफ पोलिस आहेत. त्यांनीच मोहितला क्रिकेटमध्ये करिअरसाठी प्रोत्साहन दिलं आणि अकादमीत पाठवलं, जिथे त्याने क्रिकेटचे धडे घेतले.
तो गुजरातच्या जामनगरमधील क्रिकेट बंगलो या अकादमीमध्ये महेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळ शिकला. महेंद्र सिंग चौहान हे मोठं नाव आहे. त्यांनी रविंद्र जडेजालाही प्रशिक्षण दिलं आहे. सुरुवातील मोहित ऑफ स्पिन गोलंदाजी करत असे. मोहित उंच असल्याने चांगला धावत असल्याने कोचनी त्याला पेस गोलंदाजी करण्यासाठी सल्ला दिला.