AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND U19 vs AUS U19: वैभव सूर्यवंशी तिसऱ्या वनडेत फ्लॉप, पण टीम इंडियाने 167 धावांनी मिळवला विजय

भारतीय अंडर 19 संघाने वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया व्हाईट वॉश दिला आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 3-0 ने जिंकली. तिसऱ्या वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट काही चालली नाही. पण टीम इंडियाने 167 धावांनी विजय मिळवला.

IND U19 vs AUS U19: वैभव सूर्यवंशी तिसऱ्या वनडेत फ्लॉप, पण टीम इंडियाने 167 धावांनी मिळवला विजय
IND U19 vs AUS U19: वैभव सूर्यवंशी तिसऱ्या वनडेत फ्लॉप, पण टीम इंडियाने 167 धावांनी मिळवला विजयImage Credit source: Cricket Australia X
| Updated on: Sep 26, 2025 | 6:21 PM
Share

भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाने तिसऱ्या वनडे सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. आयुष म्हात्रे पुन्हा फेल गेला. त्याचा डाव फक्त 4 धावांवर आटोपला. तर आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीही दोन षटकार मारून तंबूत परतला. त्याने 20 चेंड़ूत फक्त 16 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा होता. पण त्याला काही खास करता आलं नाही. आघाडी दोन फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरला. विहान मल्होत्राने 40, वेदांत त्रिवेदीने 86 आणि राहुल कुमारने 62 धावांची खेळी केली. या तिघांच्या खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 9 गडी गमवून 280 धावांपर्यंत मजल मारली. तसेच विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं.

विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अलेक्स टर्नर आणि टॉम होगन यांनी त्यातल्या त्यात धावा केल्या. अलेक्स टर्नरने , तर टॉम होगनने 28 धावा केल्या. कर्णधार विल मलाज्झुक फक्त 15 धावा करून तंबूत परतला. या व्यतिरिक्त इतर फलंदाज एकेरी धावांवर तंबूत परतले. दोन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. ऑस्ट्रेलियाने 28.3 षटकात सर्व गडी गमवून कशी बशी 113 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून खिलान पटेलने 7.3 षटकात 26 धावा देत 4 गडी बाद केले. तर उद्धव मोहनने 5 षचटकात 26 धावा देत 3 गडी टिपले. तर कनिष्क चौहानने 2 गडी बाद केला. या तिघांनी ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ बाद केला. भारताने हा सामना 167 धावांनी जिंकला. तसेच ऑस्ट्रेलियाला वनडे व्हाईट वॉश दिला. या विजयासह भारताने मालिका 3-0 ने खिशात घातली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, हरवंश पंगालिया (विकेटकीपर), कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, खिलन पटेल, दीपेश देवेंद्रन, उद्धव मोहन.

ऑस्ट्रेलिया अंडर-19 (प्लेइंग इलेव्हन): अ‍ॅलेक्स टर्नर, अ‍ॅलेक्स ली यंग (विकेटकीपर), स्टीव्हन होगन, विल मलाज्झुक (कर्णधार), टॉम होगन, जेडेन ड्रेपर, आर्यन शर्मा, बेन गॉर्डन, केसी बार्टन, चार्ल्स लॅचमुंड, विल बायरम.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...