
क्रिकेट चाहत्यांना एका बाजूला आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला शनिवार 18 जानेवारीपासून अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी झाले आहेत. या 16 संघांना 4-4 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा मलेशियाकडे आहे. मलेशियाची 17 वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एकूण 16 दिवसांमध्ये 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील पहिल्याच दिवशी एकूण 6 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामना पार पडेल.
ए ग्रुप : टीम इंडिया, श्रीलंका, वेस्टइंडीज आणि मलेशिया
बी ग्रुप : पाकिस्तान, आयर्लंड, इंग्लंड आणि यूएसए
सी ग्रुप : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, नायजेरिया आणि सामोआ
डी ग्रुप : ऑस्ट्रेलिया, स्कॉटलँड, बांगलादेश आणि नेपाळ
नायजेरिया आणि सामोआ या दोन्ही संघांची अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ आहे. एकूण 16 दिवस 16 संघात 41 सामने खेळवण्यात येणार आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीतील इतर 3 संघांविरुद्ध 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर प्रत्येक गटातून अव्वल 3 संघ (एकूण 12) सुपर 12 साठी पात्र ठरतील.
स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक
Presenting the ICC U19 Women’s T20 World Cup 2025 fixtures 🤩#U19WorldCup | More ➡️ https://t.co/A8MfiyM77B pic.twitter.com/ssRAsUGrHy
— ICC (@ICC) August 19, 2024
त्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सीमधील संघ (एकूण 6) एका गटात तर ग्रुप ए आणि ग्रुप डी मधील संघ दुसर्या गटात (एकूण 6) ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने 31 जानेवारीलाच पार पडतील. तर 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्याच्या निकालानंतर विजेता संघ निश्चित होईल.
शनिवारपासून अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेला सुरुवात
Changing the game ➡️ The game-changers#U19WorldCup
More 👉 https://t.co/a7Jp8KzZBm pic.twitter.com/BxZNd95OUS
— ICC (@ICC) January 15, 2025
अंडर 19 वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2023 साली झालेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत पहिलावहिला महिला वर्ल्ड कप जिंकला होता. टीम इंडियाने शफाली वर्मा हीच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती.