
भारताला अंडर 19 वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या यश धुलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे क्रीडारसिकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यश धुल हे भारताचं भविष्य असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. पण त्याच यश धुलचा जीव संकटात होता. मात्र नशिबाने वेळीच सर्वकाही कळलं आणि संकट टळलं. बीसीसीआयने यश धलचा जीव वाचवण्यात महत्त्वाचं योगदान दिलं. यश धुल बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये गेला होता. तेव्हा त्याच्या काही चाचण्या करण्यात आला. तेव्हा त्याच्या हृदयात छिद्र असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तडकाफडकी 21 वर्षांच्या यश धुलची सर्जरी केली गेली आणि बीसीसीआयने यासाठी पूर्ण मदत केली. यश धुलचे लहानपणीचे प्रशिक्षक प्रदीप कोचर यांनी माहिती दिली की, एनसीएत तपासणीदरम्यान त्याच्याबाबत हा खुलासा झाला. एनसीए डॉक्टरांनी तात्काळ सर्जरी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दिल्लीत यशवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आणि आता रिकव्हर झाला आहे.
यश धुल सध्या दिल्ली प्रीमियर लीग खेळत आहे. यश धुलच्या वडिलांनी सांगितलं की, मुलाच्या सर्जरीसाठी बीसीसीआयकडून योगदान मिळालं आणि आमच्या संपर्कात आहेत. सर्जरीनंतर यशला क्रिकेट खेळण्यासाठी एनसीएसकडून परवानगी मिळाली आहे. इतकंच काय तर दिल्ली प्रीमियर लीगमध्ये त्याच्या फिटनेसवरही नजर ठेवली जात आहे. त्यामुळे आता यश धुल फिट अँड फाईन असल्याचं दिसत आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत यशकडे फ्रेंचायझीचं लक्ष असणार आहे. यश धुलने ईस्ट दिल्ली रायडर्सविरुद्धच्या सामन्यानंतर सांगितलं की, ‘काही गोष्टी पहिल्या झाल्या आहेत.मी रिकव्हर होऊन आलो आहे. थोडा वेळ लागत आहे पण मी सकारात्मक आहे. मी माझ्या खेळासाठी 100 टक्के देणार आहे.’
अंडर 19 वर्ल्डकप 2022 स्पर्धेत यश धुलकडे टीम इंडियाची नेतृत्व होतं. त्याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिलं होतं. उपांत्य फेरीतील त्याचं शतक महत्त्वपूर्ण ठरलं होते. इतकंच काय तर त्याला टूर्नामेंटमधील सर्वोत्तम संघाचा कर्णधार निवडलं होतं. यश धुलने 2022 मध्ये रणजी ट्रॉफीत दिल्लीकडून पदार्पण केलं होतं. तामिळनाडूविरुद्ध दोन डावात शतक ठोकलं होतं. तसेच छत्तीसगडविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं. यश धुलने रणजीमध्ये 119.75 च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत.