IPL 2026 : यूपी वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये घेणार एन्ट्री, पडद्यामागे घडतंय असं काही

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगला असताना दुसरीकडे आयपीएल स्पर्धेची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मार्च महिन्यात स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी दोन फ्रेंचायझी विकल्या जाण्याची शक्यता आहे.

IPL 2026 : यूपी वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये घेणार एन्ट्री, पडद्यामागे घडतंय असं काही
IPL 2026 : यूपी वॉरियर्स संघ आयपीएलमध्ये घेणार एन्ट्री, पडद्यामागे घडतंय असं काही
Image Credit source: WPL/BCCI
| Updated on: Feb 10, 2026 | 8:59 PM

आयपीएल 2026 हे स्पर्धेच 19वं पर्व आहे. या स्पर्धेसाठी संघांची बांधणी मिनी लिलावात झाली आहे. त्यामुळे आता फक्त वेळापत्रक आलं की स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी दोन फ्रेंचायझींचे मालक बदलण्याची शक्यता वाढली आहे. खरं असं होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. डियाजियोने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी विकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, रॉयल्स स्पोर्ट्स ग्रुप राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकण्याची योजना आखत आहे. त्यामुळे, आयपीएल सुरू होण्यापूर्वी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स संघांचे मालक बदलण्याची दाट शक्यता आहे.कॅप्री ग्लोबलने राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी खरेदी करण्यास रस दाखवला आहे. आयपीएलमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या फ्रँचायझीमधील बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्यासाठी कॅप्री ग्लोबलची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे, कॅप्री ग्लोबल राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकत घेण्याची शक्यता वाढली आहे.

राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या पर्वात जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदासाठी लढत देत आहे. पण कॅप्री ग्लोबलने ही फ्रेंचायझी विकत घेतल्यास  मालकी हक्क यूपी वॉरियर्सच्या मालकाकडे जाईल. कॅप्री ग्लोबल राजस्थान रॉयल्सचं नाव बदलणार की नाही हे मात्र सांगता येत नाही.   राजस्थान रॉयल्स संघाऐवजी यूपी वॉरियर्स संघ मैदानात दिसेल अशी चर्चा फक्त सोशल मीडियावर सुरू आहे.  दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला रिलीज केलं आहे. तर रवींद्र जडेजाला ट्रेड विंडोच्या माध्यमातून घेतलं आहे. असं असताना कर्णधाराचा पेचही आहे. कॅप्री ग्लोबलचा आधीच वुमन्स प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्स नावाचा संघ आहे. आतापर्यंत चार पर्वात युपी वॉरियर्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. जेतेपदाची झोळी रितीच आहे.

दुसरीकडे, मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे मालक अवराम ग्लेझर यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझी खरेदी करण्याची तयारी केली आहे. इतकंच काय या फ्रेंचायझीमध्ये अदानी ग्रुप आणि अदार पूनावाला यांच्यासह काही व्यावसायिकांनी रस दाखवला आहे. त्यामुळे येत्या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालक बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता या महिनाभरात काही घडामोडी घडतात त्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.