IND vs PAK: पाकिस्तानसमोर ऋषभ पंत फ्लॉप पण उर्वशीने दाखवला जलवा, पहा VIDEO

| Updated on: Sep 05, 2022 | 1:08 PM

IND vs PAK: मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत चर्चेमध्ये आहे. बॉलिवूड पेक्षा सध्या ती क्रिकेटच्या मैदानातून प्रसिद्धी मिळवतेय. रविवारी उर्वशी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली.

IND vs PAK: पाकिस्तानसमोर ऋषभ पंत फ्लॉप पण उर्वशीने दाखवला जलवा, पहा VIDEO
ऋषभ पंतला सोडून Urvashi Rautela या पाकिस्तानी क्रिकेटवर फिदा
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: मागच्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सतत चर्चेमध्ये आहे. बॉलिवूड पेक्षा सध्या ती क्रिकेटच्या मैदानातून प्रसिद्धी मिळवतेय. रविवारी उर्वशी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली. याच कारण आहे, क्रिकेट मैदानावरील तिची उपस्थिती. आशिया कप स्पर्धेत सध्या भारत-पाकिस्तान मध्ये मॅचेस सुरु आहेत. काल दोन्ही टीम्स मध्ये दुसरा सामना झाला. हा सामना पहायला उर्वशी रौतेला दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये उपस्थित होती. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

कालच्या सामन्यात उर्वशी स्टेडियम मध्ये दिसली. याआधी 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये सामना झाला. त्यावेळी सुद्धा उर्वशी स्टेडियम मध्ये दिसली होती. उर्वशीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात ती निळ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसतेय.

उर्वशी आणि पंत मध्ये भांडण

उर्वशी रौतेलाच नाव भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत बरोबर जोडलं जातं. RP नावाचा एक क्रिकेटर मला हॉटेल मध्ये भेटण्यासाठी आला होता. तो सारखे कॉल करत होता, असं उर्वशीने नुकतचं एका मुलाखतीत म्हटलं होतं. आरपी नाव येताच लोकांनी त्याचा संबंध ऋषभ पंतशी जोडला. त्यानंतर ऋषभ पंतने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. लोक नाव कमावण्यासाठी खोटं बोलतात, असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर उर्वशीने त्याला उत्तर दिलं. छोटू भैया क्रिकेटवर लक्ष दे, असं उर्वशीने सोशल मीडियावर लिहिलं होतं.

पंतची बॅट चाललीच नाही

28 ऑगस्टला झालेल्या सामन्यात ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हन मध्ये संधी मिळाली नव्हती. पण कालच्या सामन्यात ऋषभला संघात स्थान दिलं होतं. पण पंतची बॅट चालली नाही. त्याने 12 चेंडूत 14 धावा करुन तंबुची वाट धरली. त्याने दोन चौकार मारले. भारतीय संघाने या सामन्यात चांगला स्कोर केला. भारताने सात विकेट गमावून 181 धावा केल्या. पण पाकिस्तानने एक चेंडू आणि पाच विकेट राखून हा सामना जिंकला.