AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urvashi Rautela: ‘छोटू भैय्या बॅट-बॉलच खेळ’, उर्वशी रौतेलाचं ऋषभ पंतला सणसणीत उत्तर

उर्वशीनेही इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये उर्वशीने ऋषभला 'छोटू भैय्या' असं खोचकपणे म्हटलं आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Urvashi Rautela: 'छोटू भैय्या बॅट-बॉलच खेळ', उर्वशी रौतेलाचं ऋषभ पंतला सणसणीत उत्तर
Urvashi Rautela and Rishabh PantImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 12, 2022 | 10:32 AM
Share

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आणि क्रिकेटर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. हे दोघं सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. ऋषभ पंत हा तिला भेटण्यासाठी हॉटेलच्या बाल्कनीमध्ये तिची वाट पाहत होता, असं उर्वशीने थेट नाव न घेतला सूचित केलं होतं. त्यावर ऋषभने इन्स्टा स्टोरी लिहित उर्वशीला उत्तर दिलं. ‘लोकप्रियता मिळवण्यासाठी काही जण खोटं बोलतात’, असंच तो थेट या पोस्टमध्ये म्हणाला होता. आता त्यावर उर्वशीनेही इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये उर्वशीने ऋषभला ‘छोटू भैय्या’ असं खोचकपणे म्हटलं आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

उर्वशीची नवीन पोस्ट-

‘छोटू भैय्याने बॅट-बॉलच खेळलं पाहिजे. बदनाम होण्यासाठी मी काही मुन्नी नाही. डार्लिंग तुला रक्षाबंधनच्या शुभेच्छा’, अशी पोस्ट तिने लिहिली आहे. त्यासोबतच ‘आरपी छोटू भैय्या’, ‘शांत मुलीचा फायदा घेऊ नकोस’ अशा आशयाचे हॅशटॅग्स दिले आहेत. याआधी ऋषभने इंस्टाग्राम स्टोरीवर एक नोट पोस्ट केली होती, जी उर्वशीसाठीच होती असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. ऋषभने मात्र त्यात तिचं नाव घेतलं नव्हतं. “फक्त लोकप्रियतेसाठी आणि हेडलाईन्समध्ये झळकण्यासाठी काही लोक मुलाखतींमध्ये कसं खोटं बोलतात हे मजेशीर आहे. काही लोक प्रसिद्धी आणि नावासाठी भुकलेले आहेत याचं वाईट वाटतं. देव त्यांना आशीर्वाद देवो,” अशी पोस्ट त्याने लिहिली होती. यासोबतच त्याने ‘मेरा पिछा छोडो बहन’, ‘झूठ की भी सीमा होती है’ असे हॅशटॅग दिले होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशीने तिच्या दिल्लीतील शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. या मुलाखतीत तिने असा दावा केला होता की कोणीतरी तिला भेटण्यासाठी रात्रभर वाट पाहत होतं. ती म्हणाली, “आरपी (RP) हॉटेलच्या लॉबीमध्ये आला होता आणि त्याला मला भेटायचं होतं. दहा तास झाले होते आणि मी झोपली होती. मी एकही कॉल अटेंड करू शकले नाही आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मला 16-17 मिस्ड कॉल दिसले आणि मला खूप वाईट वाटलं की कोणीतरी माझी वाट पाहत होतं आणि मी त्यांना भेटू शकले नाही. मी त्याला म्हणाले की मुंबईला गेल्यावर भेटू. आम्ही मुंबईत भेटलो पण पापाराझींमुळे खूप मोठा ड्रामा झाला.”

उर्वशीने जेव्हा एका क्रिकेटरला डेट करत असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा सर्वांनी तो क्रिकेटर ऋषभ पंत आहे, असा अंदाज वर्तवला होता. मात्र या चर्चांना त्याने साफ नकार दिला होता आणि तिला सोशल मीडियावर ब्लॉकही केलं होतं.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा