CAN vs USA Playing XI: यूएसएचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, मुंबईकर खेळाडूला प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी
ICC T20 World Cup 2024 United Stats vs Canada Playing XI: यूएस क्रिकेट टीममध्ये मुंबईकर खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. हा खेळाडू टीम इंडियाकडून अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झाला होता.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला यूएसएमध्ये सुरुवात झाली आहे. सलामीच्या सामन्यात यूएसए विरुद्ध कॅनडा आमनेसामने आहेत. या सलामीच्या सामन्यात यूएसएने नाणेफेक जिंकली. यूएसएचा कर्णधार मोनांक पटेल याने टॉस जिंकून चेसिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडा बॅटिंगची संधीचा कितपत फायदा घेत किती धावसंख्या उभारते,याकडे लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला यूएसए क्रिकेट टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये टीम इंडियासाठी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
मुंबईतील मालाडचा असलेला सौरभ नेत्रवाळकर याला यूएसकडून कॅनडा विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं आहे. सौरभने यूएसकडून खेळण्याआधी मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच सौरभ टीम इंडियाकडून 2010 साली अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला आहे. सौरभने केएल राहुल, हर्षल पटेल आणि मयंक अग्रवाल या आताच्या प्रतिष्ठित खेळाडूंसह तेव्हा अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं.
यूएसए कॅनडावर वरचढ
यूएसए विरुद्ध कॅनडा या उभयसंघात टी 20 फॉर्मेटमध्ये एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. उभयसंघांचा इतिहास हा जवळपास 150 वर्षांचा आहे. उभयसंघातील 8 सामन्यांपैकी सर्वाधिक सामन्यात यूएसए वरचढ राहिली आहे. यूएसएने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर कॅनडाने 2 वेळा विजय मिळवण्यात यश मिळवलं आहे.
सौरभ नेत्रवाळकर
Saurabh Netravalkar who represented India in the 2010 U-19 World Cup, is all set to play for the US in the T20 World Cup!
.
.
.
.
.
.#IPL #BCCI #Coach #GautamGambhir #T20WorldCup2024 #T20WorldCup #RohitSharma #T20WorldCup #T20WorldCup24 #IndvsBan #IndvBan #ViratKohli… pic.twitter.com/tky9w0DRTO— Cricketism (@MidnightMusinng) June 2, 2024
यूएसए प्लेईंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, अली खान आणि सौरभ नेत्रवाळकर.
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत सिंग, निखिल दत्ता, डिलन हेलिगर, कलीम साना आणि जेरेमी गॉर्डन.