USA vs ENG: इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक, यूएसएवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय

United States vs England Match Result: इंग्लंड टीमने सुपर 8 मधील सामन्यात यूएसए विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवत सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.

USA vs ENG: इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक, यूएसएवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय
Jos Buttler and Philip Salt
Image Credit source: Icc X account
| Updated on: Jun 23, 2024 | 11:13 PM

गतविजेत्या इंग्लंड क्रिकेट टीमने कॅप्टन जॉस बटलर याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. इंग्लंड सेमी फायनमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. इंग्लंडने यूनायडेट स्टेट्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. यूएसएने इंग्लंडला विजयासाठी 116 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने हे आव्हान जॉस बटलरच्या नाबाद 83 धावांच्या जोरावर 9.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. जॉसने 38 बॉलमध्ये 7 सिक्स आणि 6 फोरसह नाबाद 83 धावा केल्या. तर फिलीप सॉल्टने 21 चेंडूत नाबाद 25 धावांचं योगदान दिलं. तर यूएसएचं या पराभवासह स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

त्याआधी इंग्लंडने टॉस जिंकून यूएसएला बॅटिंगसाठी बोलावलं. धडपडत सुरुवात करणाऱ्या यूएसएला ख्रिस जॉर्डनने डावातील 19 व्या ओव्हरमधील 5 बॉलमध्ये हॅटट्रिकसह 4 विकेट्स घेऊन 18.5 ओव्हरमध्ये 115 धावांवर ऑलआऊट केलं. यूएसएकडून नितीश कुमार याने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. कॉरी एंडरसन याने 29 धावांचं योगदान दिलं. तर हरमीत सिंह याने 21 धावा जोडल्या. कॅप्टन आरोन जोन्सने 10 धावा केल्या. तर स्टीव्हन टेलर 12 धावा करुन मैदानाबाहेर परता. एंड्रीस गोस याने 8 आणि मिलिंद कुमारने 4 रन्स केल्या. तर तिघांना भोपळही फोडता आला नाही. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने 2.5 ओव्हरमध्ये सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सॅम करन आणि आदिल रशीदने 2-2 विकेट्स मिळवल्या. तर रीस टोपली आणि लियाम लिविंग स्टोनच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

दरम्यान इंग्लंडचा हा सुपर 8 मधील दुसरा विजय ठरला. इंग्लंडने सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात विंडिजवर 8 विकेट्सने विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात जवळपास जिंकलेला सामना 7 धावांनी गमावला. तर आता यूएसएवर विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.

इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम

यूएसए प्लेइंग ईलेव्हन : आरोन जोन्स (कॅप्टन), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, मिलिंद कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, नॉथुश केन्जिगे, अली खान आणि सौरभ नेत्रावळकर.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरान, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.