AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs MI : वैभव-जैस्वालची विस्फोटक बॅटिंग, राजस्थानच्या सलामी जोडीचे पलटण विरुद्ध इतके सारे विक्रम

Vaibhav Sooryavanshi and Yashasvi Jaiswal : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये 80 रन्सची पार्टनरशीप केली. या सलामी जोडीने विक्रमी भागीदारीसह काही विक्रम केले आहेत.

RR vs MI : वैभव-जैस्वालची विस्फोटक बॅटिंग, राजस्थानच्या सलामी जोडीचे पलटण विरुद्ध इतके सारे विक्रम
Yashasvi Jaiswal and Vaibhav Sooryavanshi RR vs MIImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 08, 2026 | 4:19 AM
Share

वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या राजस्थान रॉयल्सच्या सलामी जोडीने मंगळवारी 7 एप्रिलला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. वैभव सूर्यवंशी याने जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर आणि ट्रेंट बोल्ट यासारख्या गोलंदाजांची धुलाई केली. तर दुसऱ्या बाजूलाने यशस्वी जैस्वाल यानेही मुंबईच्या गोलंदाजांना बॅटिंगने चोप दिला. यशस्वी आणि वैभव या सलामी जोडीने पावसामुळे झालेल्या या 11 षटकांच्या सामन्यात राजस्थानला वेगवान, वादळी आणि अपेक्षित अशी सुरुवात मिळवून दिली. वैभव आण यशस्वीने पहिल्या 5 ओव्हरमध्ये अर्थात 30 चेंडूत 80 धावांची भागदीरी केली.

वैभव आणि यशस्वी सलामी जोडीचा झंझावात

वैभव आणि यशस्वी ज्या पद्धतीने बॅटिंग करत होते त्या हिशोबाने राजस्थान सहज 170 धावांपर्यंत पोहचेल असं चित्र होतं. मात्र शार्दूल ठाकुर याने पाचव्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर वैभव सूर्यवंशी याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. यासह वैभव-यशस्वीच्या 80 धावांच्या सलामी जोडीचा शेवट झाला. मात्र वैभव आणि यशस्वीने या भागीदारीसह इतिहास घडवला. या दोघांनी काही विक्रम आपल्या नावावर केले. यशस्वी आणि वैभवने नक्की काय काय विक्रम केले? हे सविस्तर जाणून घेऊयात.

वैभवने फक्त 14 बॉलमध्ये 278.57 च्या स्ट्राईक रेटने 39 रन्स केल्या. वैभवने या दरम्यान 5 षटकार आणि 1 चौकार लगावला. तर ओपनिंगला आलेला यशस्वी नाबाद परतला. यशस्वीने 32 बॉलमध्ये 240.62 च्या स्ट्राईक रेटने 77 रन्स केल्या यशस्वीने या खेळीत 4 षटकार आणि 10 चौकार लगावे. यशस्वीचं हे 19 व्या मोसमातील सलग आणि एकूण दुसरं तर कारकीर्दीतील मुंबई विरुद्धचं तिसरं अर्धशतक ठरलं. तसेच वैभव आणि यशस्वीची 19 व्या मोसमात 50 पेक्षा अधिक धावांची सलामी भागीदारी करण्याची ही एकूण-सलग तिसरी वेळ ठरली.

लाईव्ह स्कोअर

वैभव आणि यशस्वी जोडीने केलेले विक्रम

वैभव आणि यशस्वीने केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थानने मोठा बहुमान मिळवला. राजस्थान वेगवान 50 धावा करणारी दुसरी टीम ठरली.

वैभव आणि यशस्वीने राजस्थानसाठी 16 बॉल अर्थात 2.4 ओव्हरमध्ये 50 धावा केल्या. यशस्वी आणि वैभव स्पर्धेत वेगवान 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी करणारी दुसरी जोडी ठरली.

तसेच राजस्थान पहिल्या 3 ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी पहिलीच टीम ठरली. वैभव आणि यशस्वी या दोघांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 6 षटकार लगावले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल