6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6… वैभव सूर्यवंशीनं इतिहास-भूगोलच बदलला, 28 बॉलमध्ये तुफानी शतक, 11 वर्षाचं रेकॉर्ड मोडलं

Vaibhav Sooryavnshi याने यूएईविरुद्धच्या सामन्यात वादळी फलंदाजी करत रेकॉर्ड ब्रेक करणारं शतक ठोकलं आहे. त्याने त्याच्या एका खेळीमध्ये मोठे रेकॉर्ड्स बनवले तर एका मोठ्या खेळाडूचा रेकॉर्ड मोडत सर्वात मोठा रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे.

6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... वैभव सूर्यवंशीनं इतिहास-भूगोलच बदलला, 28 बॉलमध्ये तुफानी शतक, 11 वर्षाचं रेकॉर्ड मोडलं
Vaibhav Sooryavanshi Fastest Odi Century
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 24, 2026 | 5:09 PM

Vaibhav Sooryavanshi World Record : वैभव सूर्यवंशी दोहा स्टेडियमवर असे वादळ निर्माण केले की सर्वात जलद शतकाचा जागतिक विक्रम मोडीत निघाला. वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध अवघ्या २८ चेंडूंमध्ये शतक झळकावले. वैभव सूर्यवंशीने १४ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. यासह, वैभव सूर्यवंशीने लिस्ट ‘अ’ क्रिकेटमधील सर्वात जलद शतक पूर्ण केले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेक फ्रेझर मॅगार्कच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे.

वैभव सूर्यवंशीने दिग्गजांना पछाडलं

वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए सामन्यात अवघ्या २८ चेंडूंमध्ये शतक झळकावले.

Loading...

जॅक फ्रेझर मॅगार्कने टास्मानियाविरुद्ध २९ चेंडूंमध्ये शतक झळकावले.

एबी डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध ३१ चेंडूंमध्ये शतक झळकावले.

साकिब गनीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ३२ चेंडूंमध्ये शतक झळकावले.

ईशान किशनने कर्नाटकविरुद्ध ३३ चेंडूंमध्ये शतक झळकावले.

वैभव सूर्यवंशीने विश्वविक्रम मोडला

वैभव सूर्यवंशीने आपल्या डावातील पहिले दोन चेंडू निर्धाव खेळले, पण त्यानंतर झाहिद अलीने टाकलेल्या सलग तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. पुढच्या षटकात त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. तिसऱ्या षटकात दोन षटकार मारून त्याने अवघ्या १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. सिमरजीत सिंगच्या षटकात तीन षटकार मारून त्याने पाचव्याच षटकात संघाची धावसंख्या १०० च्या पुढे नेली. त्यानंतर वैभवने पुढच्या सहा चेंडूंमध्ये तीन षटकार आणि दोन चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. सूर्यवंशीने १५ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us