AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?

Vaibhav Suryavanshi in Team India: वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचा चेहरा होईल का, याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून आहे. राष्ट्रीय संघात त्याला संधी मिळाल्यास कारकि‍र्दीत त्याला विक्रम नोंदवता येईल. याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे.

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी Team India मध्ये? केव्हा लॉटरी लागणार, कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? काय मोठी अपडेट?
वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 09, 2026 | 2:40 PM
Share

Vaibhav Suryavanshi in Team India: गेल्या दोन वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये सूर्यवंशीचे वैभव दिसत आहे. स्थानिक पातळीवरील क्रिकेटपासून ते 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वकपातील त्याच्या धडाकेबाज कामगिरीने तो लंबी रेस का घोडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभव सूर्यवंशीला राष्ट्रीय क्रिकेट संघात घ्यावे अशी सर्वांची आग्रही मागणी आहे. आयपीएलच्या तीनही सामन्यात त्याने डोळ्याचे पारणे फेडणारी कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) नियमानुसार, आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी कमीत कमी 15 वर्षांचा खेळाडू हवा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा ऐन उमेदीच्या काळात पाकिस्तानविरोधात धावांची लड लावली होती. आता वैभव सूर्यवंशी याला टीम इंडियात संधी देण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे त्याला कारकि‍र्दीत अनेक विश्व विक्रम नोंदवण्याची संधी मिळेल.

कोणत्या खेळाडूची जागा घेणार?

वैभव सूर्यवंशी हा स्फोटक फलंदाज आहे. तो सलामीवीर आहे. त्याच्या फलंदाजीचा अंदाज आणि आक्रमक खेळी पाहता तो अनेक विक्रम नावावर नोंदवू शकतो. वैभवने टी20 आणि IPL 2026 मध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. भारताच्या टी20 संघात तो कधी जागा घेणार आणि कोणत्या खेळाडूच्या जागी त्याला घेणार हा प्रश्न कायम आहे. वैभव सूर्यवंशी हा घरगुती क्रिकेट आणि आयपीएल सामन्यात सलामीला उतरतो. नवीन चेंडूला घायाळ करण्यात त्याला मोठा आनंद येतो. तर गोलंदाजाची दमछाक करणे त्याला आवडते. मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात त्याने दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या पहिल्याच चेंडूत षटकार ठोकून त्याला दयामाय नसल्याचे दाखवून दिले. तो दबावाखाली खेळत नसल्याचेही समोर आले.

भारतीय संघाचा, Team India चा विचार करता, सध्या संघाच्या वरच्या फळीत दुसरा खेळाडू सामावेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे वैभव सूर्यवंशीला टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागा करण्यासाठी थोडा कालावधी कळ सोसावी लागेल. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन हे 3 दमदार फलंदाज टॉप ऑर्डरमध्ये आहेत. तिलक वर्मा अजून प्रतिक्षा यादीत आहे. सॅमसनने त्याची जागा घेतल्यापासून त्याला क्रमवारीत थोडं खाली खेळावं लागत आहे.

मग क्रमवारीत 5 व्या अथवा 6 व्या स्थानी संधी?

वैभव सूर्यवंशी हा सलामीवीर म्हणून ओळखल्या जातो. संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यात आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तो जबरदस्त खेळाडू म्हणून ओळखल्या जातो. त्यामुळे क्रमवारीत त्याला टॉप ऑर्डरनंतर खेळवल्यास त्याचा कितपत उपयोग होईल याविषयी साशंकता आहे. आतापर्यंत त्यांना T20 मधील 21 सामन्यांमध्ये 3 शतक आणि दोन अर्धशतकसहीत 823 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये पण त्याची दमदार कामगिरी दिसली आहे.

Follow Us
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे
महायुतीत जागावाटपावरून महाभारत! मुख्यमंत्री फडणवीसांनीच सांगितलं कुठे.
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा
महागाईने जनता हैराण; रोहित पवार म्हणाले शिंदे साहेब आता तरी नाराज व्हा.
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत 
चार वेळा दरवाढ, आता पेट्रोलच गायब! इंधन टंचाईच्या झळा मुंबईपर्यंत .
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर.....
ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर......
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न...
RTO अधिकारी उतरले रस्त्यावर! रिक्षाचालकांना थेट मराठीत प्रश्न....
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ
देशावर मोठं आर्थिक संकट येणार; त्या नेत्याच्या वक्तव्याने राज्यत खळबळ.
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स
TCS धर्मांतर प्रकरणात ट्विस्ट; आरोपींच्या समर्थनार्थ मायनॉरिटी डिफेन्स.
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा
100 कोटींची निवडणूक; विजय वडेट्टीवारांचा स्फोटक दावा, महायुतीवर निशाणा.
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे..
विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला! भाजपचा दबदबा कायम; शिंदे...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची...
पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! श्रीनाथ हॉटेलवर हल्ला, वाहनांची....