वैभव सूर्यवंशीने प्लेनमध्ये असं काय केलं की प्रत्येक जण करतोय सलाम, Watch Video

वैभव सूर्यवंशी हे नाव सध्या क्रिकेटविश्वात गाजत आहे. प्रत्येक जण 14 वर्षीय क्रिकेटपटूची चर्चा करत आहे. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा प्लेऑफचा प्रवास संपला आहे. मात्र दोन औपचारिक सामने शिल्लक आहेत. यासाठी राजस्थान रॉयल्सचा संघाने विमान प्रवास केला. तेव्हा वैभव सूर्यवंशीने प्लेनमध्ये केलेली कृती सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरत आहे.

वैभव सूर्यवंशीने प्लेनमध्ये असं काय केलं की प्रत्येक जण करतोय सलाम, Watch Video
वैभव सुर्यवंशी
Image Credit source: PTI
| Updated on: May 17, 2025 | 12:51 AM

राजस्थान रॉयल्सचा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी आयपीएल मेगा लिलावापासून चर्चेत आहे. मेगा लिलावात त्याने 1 कोटी 10 लाखांची किंमत मिळवली. त्यानंतर पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपला हेतू स्पष्ट केला. त्याचे हे कौतुक संपत नाही तोच गुजरात टायटन्स विरूद्धच्या सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकलं. मोहम्मद सिराज, इशान शर्मासारख्या दिग्गज गोलंदाजांना त्याने फोडून काढलं. त्यामुळे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. आता पुढे कोणती कामगिरी करतो? याकडे लक्ष लागून आहे. असं असताना वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात संपूर्ण संघ विमानात बसलेला दिसत आहे. सोशल मिडिया टीम इतक व्हिडीओ तयार होती. तेव्हा वैभव सूर्यवंशी कॅमेरामनला सीट ऑफर करतो. यात विशेष असं काही नाही. पण त्याच्या इंग्रजीचं कौतुक होत आहे.

वैभव सूर्यवंशीचं इंग्रजी

वैभव सूर्यवंशी कॅमेरामनला पाहतो आणि त्याला बाजूच्या रिकाम्या खूर्चीवर बसण्याचा आग्रह करतो. ‘Sit With Us’ असं वैभव सूर्यवंशी इंग्रजीत सांगतो. दरम्यान, सोशल मीडियावर वैभव सूर्यवंशी दहावी नापास झाल्याची अफवा उडाली होती. मात्र सोशल मीडियावरील अफवा काही तासातच हवेत विरली. कारण वैभव सूर्यवंशी यंदा दहावीला आहे. तसेच 2026 साली परीक्षा देणार आहे. वैभव सूर्यवंशी 13 वर्षांचा असताना आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. स्पर्धेदरम्यान त्याने 14वा वाढदिवस साजरा केला.

वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात 34 धावा केल्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध 16 धावा केल्या. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 101 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला खातं खोलता आलं नाही. पाचवा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झाला. या सामन्यात फक्त 4 धावांवर खेळ आटोपला. वैभव सूर्यवंशीने पाच सामन्यात एकूण 155 धावा केल्या आहे. त्याने 209.45 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. यात 16 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत.