AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ओपन चॅलेंज, म्हणाला आता…

आयपीएल 2026 स्पर्धेला आता फक्त दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना या स्पर्धेची सुरूवात विजयाने करण्यास सर्वच संघ आतुर आहेत. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात 30 मार्चला लढत होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ओपन चॅलेंज, म्हणाला आता...
IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ओपन चॅलेंज, म्हणाला आता...Image Credit source: PTI
| Updated on: Mar 25, 2026 | 3:48 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. त्यानंतर जसे दिवस पुढे जातील तसे सामने होत जातील. 30 मार्चला राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. बऱ्याच अर्थाने ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. कारण ट्रेड विंडोच्या माध्यमातून दोन मोठ्या खेळाडूंची आदलाबदल झाली आहे. संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा आता परस्पर विरोधी संघातून खेळणार आहेत. हा सामना गुवाहाटीत होणार असून राजस्थान रॉयल्सचं दुसरं होम ग्राउंड मानलं जातं. असं असताना युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने चेन्नई सुपर किंग्स संघाला ओपन चॅलेंज दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सला पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारण्यास सज्ज असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे या सामन्याची रंगत वाढली आहे.

वैभव सूर्यवंशी सीएसकेबाबत काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशीने महेंद्रसिंह धोनीच्या संघाला थेट आव्हान कुठे आणि कधी दिलं? याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. बीसीसीआयच्या NAMAN पुरस्कार सोहळ्यात आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी हे दोघं स्टार खेळाडू एकत्र आले होते. तेव्हा वैभव सूर्यवंशीने धोनीच्या आयपीएल संघातील खेळाडू आयुष म्हात्रेला आव्हान दिलं. वैभव सूर्यवंशीने आयुष म्हात्रेला सांगितलं की, राजस्थान रॉयल्समध्ये मी आल्यापासून सीएसकेचा संघ दोन वेळा हरला आहे. यावेळी 4-0 अशी स्थिती असेल. वैभव सूर्यवंशीच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ असा की, यावेळी दोन्ही सामन्यात सीएसकेला पराभूत करू. मागच्या वर्षी दोन्ही सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली होती. यंदाही दोन सामने होणार आहेत.

मागच्या पर्वातही राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ 30 मार्चला आमनेसामने आले होते. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सला 6 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण या सामन्यात वैभव सूर्यवंशी संघाचा भाग नव्हता. त्याने हा सामना बेंचवर बसून पाहिला. त्यानंतर दुसर्‍यांदा आमनेसामने आल्यानंतर राजस्थानने 6 गडी राखून चेन्नई सुपर किंग्सला मात दिला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 33 चेंडूत 57 धावा केल्या. यात 4 षटकार आणि 4 चौकार मारले होते.

Follow Us
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....