AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला, 15 हजार कोटींची बोली कोणी लावली?

आयपीएल 2026 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला आहे. हा संघ 15 हजार कोटींना विकला गेला आहे. हा संघ कोणी घेतला? यापूर्वी कोण मालक होतं? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला, 15 हजार कोटींची बोली कोणी लावली?
IPL 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला, 15 हजार कोटींची बोली कोणी लावली?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 24, 2026 | 5:24 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहे. काही फ्रेंचायझी खेळाडूंच्या गैरहजेरीमुळे संकटात आल्या आहेत. तर काही फ्रेंचायझी पर्यायी खेळाडू शोधण्यासाठी धडपड करत आहेत. असं असताना आयपीएल स्पर्धेत पहिलं जेतेपद मिळवणारा चॅम्पियन राजस्थान रॉयल्स संघाला नवा मालक मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजस्थान रॉयल्स संघाचा मालक बदलला जाणार अशी चर्चा होती. अखेर 1.65 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 15 हजार कोटींची बोली लावली गेली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा विक्री झाल्यावर शिक्कामोर्तब केलं गेलं. अमेरिकेतील उद्योगपती काल सोमानी आणि त्यांच्या ग्रुपने या फ्रेंचायझीवर सर्वाधिक बोली लावली. ही बोली मान्य केल्यानंतर संघ विक्री झाल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स संघाने पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं. पण जवळपास 17 पर्व ही जेतेपदाविना गेली. 2022 मध्ये फ्रेंचायझीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र तेव्हाही निराशा पदरी पडली. आयपीएल 2025 स्पर्धा पार पडल्यानंतर फ्रेंचायझीने मालकी हक्क विकण्याची इच्छा व्यक्त केली होती. या संघाचा मालकी हक्क भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती मनोज बदाळे यांच्याकडे होता. त्यांच्याकडे फ्रेंचायझीचा मालकी हक्क हा 65 टक्के होतो, तर 15 टक्के मालकी हक्क अमेरिकेची गुंतवणूक कंपनी रेडबर्ड कॅपिटल्सकडे होता. तसेच 13 टक्के मालकी हक्क ब्रिटीश उद्योगपती लॅकलॅन मर्डोक यांच्याकडे आणि उर्वरित 7 टक्के इतर गुंतवणूकदारांकडे होता.

रिपोर्टनुसार, राजस्थान रॉयल्सची विक्री आयपीएलच्या पुढच्या पर्वापासून लागू होईल.. सोमानी यांच्या व्यतिरिक्त, जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्टचे मालक असलेल्या वॉल्टन कुटुंबातील रॉब वॉल्टन आणि फोर्ड मोटर कंपनीच्या सदस्य शीला फोर्ड हॅम्प यांचाही या संघात समावेश आहे. पण त्यांचा वाटा नेमका किती हे मात्र कळू शकलेलं नाही. वॉल्टन आणि फोर्ड हॅम्प हे अमेरिकन रग्बी लीग एनएफएल संघाचे मालक आहेत. आयपीएल इतिहासातील ही सर्वात मोठी डील आहे. यापूर्वी गुजरात टायटन्समधील 67 टक्के हिस्सा टोरेंट ग्रुपने सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सकडून 5 हजार 25 कोटींना घेतला होता. त्यामुळे फ्रेंचायझीचं मूल्यांकन 7500 कोटी झालं होतं. सीव्हीसी कॅपिटल्सने 33 टक्के हिस्सा आपल्याकडे ठेवला आहे. त्यांनी 2021 मध्ये हा संघ 5625 कोटींना विकत घेतला होता.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाने कात टाकली आहे. संजू सॅमसनला ट्रेड विंडोच्या माध्यमातून रिलीज करून रवींद्र जडेजाला घेतलं आहे. तसेच कर्णधारपद रियान परागच्या खांद्यावर टाकलं आहे.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल