AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेत जसप्रीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा हुकूमाचा एक्का आहे. कोणत्याही क्षणी सामना पालटण्याची ताकद त्याच्यात आहे. असं असताना जसप्रीत बुमराहबाबत एक बातमी समोर आली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? झालं असं की...
IPL 2026 : मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं, जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? झालं असं की...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 23, 2026 | 8:49 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज झाले आहे. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेच्या इतिहासात पाच वेळा जेतेपद मिळवलं आहे. तर सहाव्यांदा जेतेपदाचं स्वप्न उराशी बाळगून संघ उतरणार आहे. मुंबई इंडियन्सने शेवटचं जेतेपद 2020 मध्ये पटकावलं होतं. त्यानंतर पाच वर्षे जेतेपदाचा दुष्काळ आहे. संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असून अशी स्थिती असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे संघ पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरणं गरजेचं आहे. या संघात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहची गरज आहे. पण स्पर्धा सुरू होण्याआधीच जसप्रीत बुमराहामुळे टेन्शन वाढलं आहे. एका रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अचानक बंगळुरूतील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह काय झालं? या चर्चांना उधाण आलं आहे. कारण एखादा खेळाडू जखमी झाला किंवा सावरण्यासाठी या सेंटरमध्ये हजेरी लावतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल 2026 स्पर्धेला अवघ्या एका आठवड्यांचा अवधी शिल्लक असताना बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह जखमी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतकंच काय तर मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमराह शिवाय सुरूवातीचे सामने खेळावे लागतात की काय? असाही प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू तयारीला लागले आहेत. पण सराव शिबिरात जसप्रीत दिसत नाही. त्यामुळे टेन्शन वाढणं सहाजिकच आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 संपल्यानंतर मुंबई इंडियन्सने टीम इंडियाच्या आणि संघातील विदेशी खेळाडूंना आराम दिला होता. याबाबत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा संघात दाखल झाले असून सराव करत आहेत. पण जसप्रीत बुमराह नाही. जसप्रीत बुमराह आता 32 वर्षांचा आहे. पण गेल्या काही वर्षात फिटनेसच्या चिंतेनं ग्रासलं आहे. आयपीएल 2023 स्पर्धेतही याच कारणामुळे खेळला नव्हता. तसेच टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेलाही मुकला होता. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या चाहत्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!