AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएलचा शेवटचा हंगाम? सीएसकेच्या कार्यक्रमात म्हणाला… Video

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या पर्वापासून महेंद्रसिंह धोनी खेळत आहे. 18 पर्व पार पडली असून 19व्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार या चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून सुरू आहेत. अस असताना धोनीने सीएसकेच्या कार्यक्रमात एक हिंट दिली आहे.

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएलचा शेवटचा हंगाम? सीएसकेच्या कार्यक्रमात म्हणाला... Video
IPL 2026: महेंद्रसिंह धोनीसाठी आयपीएलचा शेवटचा हंगाम? सीएसकेच्या कार्यक्रमात म्हणाला... VideoImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 23, 2026 | 5:34 PM
Share

आयपीएल स्पर्धा सुरू झाली की गेल्या चार पाच वर्षांपासून एकच चर्चा असते. महेंद्रसिंह धोनीचं यंदा शेवटचं पर्व असणार आहे. पण महेंद्रसिंह धोनी मात्र आयपीएल स्पर्धा खेळतच आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात सुरूवातीला होणाऱ्या चर्चा नंतर केराच्या टोपलीत जातात. असं असताना यंदाही महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत वावड्या उठल्या आहे. महेंद्रसिंह धोनी यंदा शेवटची आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण खरंच महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार आहे का? त्याचं उत्तर खुद्द महेंद्रसिंह धोनी एका कार्यक्रमात दिलं. चेन्नई सुपर किंग्साच एक कार्यक्रम 22 मार्च 2026 रोजी पार पडला. या कार्यक्रमात निवृत्तिबाबतचा प्रश्न थेट महेंद्रसिंह धोनीला विचारला गेला. तेव्हा त्याने त्याचं उत्तर हसतच दिलं. धोनीने यावेळी थेट काही सांगितलं नाही, पण फिटनेसबाबात सांगत या प्रश्नाचं उत्तर दिलं.

महेंद्रसिंह धोनी सध्या 44 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याचं फिटनेस आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. धोनीने आयपीएल स्पर्धेतील निवृत्तिबाबतच्या प्रश्नावर सांगितलं की, फिटनेसची पातळी कधी वर, तर कधी खाली जात आहे. अशा स्थितीत कठीण आहे. पण खेळण्याचा प्रयत्न वारंवार सुरू आहे. जितकं चांगलं देता येईल तितकं चांगलं देण्याचा प्रयत्न आहे. महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा निवृत्तीच्या प्रश्नावर थेट काही उत्तर दिलं नाही. त्यामुळे यंदाचं पर्व शेवटचं आहे की नाही हे सांगता येणं कठीण आहे. पण वय आणि फिटनेसचं कारण सांगत निवृत्तीची वेळ जवळ येत असल्याचे संकेत मात्र दिले आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनच उतरण्याची शक्यता आहे. तसेच विकेटमागून खेळाडूंना मार्गदर्शन करून शकतो. मागच्या पर्वात ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने महेंद्रसिंह धोनीने धुरा सांभाळली होती. मात्र हवी तशी कामगिरी संघाकडून झाली नाही. आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तसेच 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. त्यामुळे 8 गुण आणि -0.647 नेट रनरेटसह शेवटच्या स्थानी समाधान मानावं लागलं.

Follow Us
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर