AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीचं खतरानक स्वप्न, गोलंदाजांनाही फुटेल घाम; 20 वर्षात… नेमकं काय म्हणाला?

वैभव सूर्यवंशी हा अवघ्या 15 वर्षांचा आहे. यंदाचा आयपीएल तो राजस्थान रॉयल्स या संघाकूडन खेळला. याच राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स या सोशल मीडियाव चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या वैभव त्याची फलंदाजी आणि त्याचं क्रिकेटमधील करिअर याविषयी तो बोलला आहे.

वैभव सूर्यवंशीचं खतरानक स्वप्न, गोलंदाजांनाही फुटेल घाम; 20 वर्षात... नेमकं काय म्हणाला?
VAIBHAV SURYAWANSHIImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2026 | 3:34 PM
Share

Vaibhav Suryawanshi : भारताचा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने कमाल करून दाखवली आहे. आयपीएलमध्ये त्याने धावांचा अक्षरश: पाऊस पाडून दाखवला. त्याच्या याच तुफानी फलंदाजीमुळे त्याचा यावेळी भारतीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. आता वैभव सूर्यवंशी हा आयर्लंड-इंग्लंड आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा भाग असेल. वैभव सूर्यवंशी आता भारताकडून खेळतानादेखील मोठी कमाल करून दाखवणार असल्याचा दावा त्याचे चाहते करत आहेत. दरम्यान, त्याच्या फलंदाजीची सगळीकडे चर्चा होत असताना दुसरीकडे त्याचा मुलाखतीमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. आगामी 20 वर्षांचा त्याचा क्रिकेटविषयीचा प्लॅन रेडी आहे. त्याचे भविष्याचे नियोजन ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत.

मी भविष्यात जोपर्यंत क्रिकेट खेळेन तोपर्यंत…

वैभव सूर्यवंशी हा अवघ्या 15 वर्षांचा आहे. यंदाचा आयपीएल तो राजस्थान रॉयल्स या संघाकूडन खेळला. याच राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स या सोशल मीडियाव चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या वैभव त्याची फलंदाजी आणि त्याचं क्रिकेटमधील करिअर याविषयी तो बोलला आहे. मला असं क्रिकेट खेळायचं आहे की, ते पाहून हा प्लेअर एकटाच सामना जिंकून देऊ शकतो, असे लोक म्हणाले पाहिजेत, असं त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. “मी भविष्यात जोपर्यंत क्रिकेट खेळेन तोपर्यंत मला खूप क्रिकेट खेळायचं आहे. माझा खेळ पाहून हा प्लेअर एकटाच मॅच जिंकून देऊ शकतो, असं लोक मला म्हणाले पाहिजेत. माझा दबदबा राहिला पाहिजे. त्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे,” असे वैभव सूर्यवंशीने आपल्या या मुलाखतीत म्हटलेले आहे.

दबदाब पुढच्या 10 ते 20 वर्षांपर्यंत राहिला पाहिजे

मी आलो, खेळलो आणि सामना संपला, असा खेळ मला खेळायचा नाही. माझ्या खेळण्याचा दबदाब हा पुढच्या 10 ते 20 वर्षांपर्यंत राहिला पाहिजे. मला क्रिकेट खेळायला चांगले वाटते म्हणूनच मी ते खेळत राहिलो. क्रिकेट खेळत खेळत मला माझ्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, असेही वैभव सूर्यवंशी म्हणाल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता वैभव सूर्यवंशी आपल्या भारतीय संघासाठी नेमकी काय कामगिरी करू शकतो, ते पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...