VIDEO : 17 षटकार, 10 चौकार आणि 210 धावा, T-20 कोण हा धडाकेबाज फलंदाज? जाणून घ्या…

| Updated on: Jul 29, 2022 | 1:53 PM

गुस्ताव मॅकॉनने आतापर्यंत फक्त तीन टी-20 सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने अर्धशतक किंवा शतक झळकावले आहे. या खेळाडूने 3 सामन्यात 95 पेक्षा जास्त सरासरीने 286 धावा केल्या आहेत.

VIDEO : 17 षटकार, 10 चौकार आणि 210 धावा, T-20 कोण हा धडाकेबाज फलंदाज? जाणून घ्या...
गुस्ताव मॅकॉन
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  सर्वात तरुण टी-20 (T-20) आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा फ्रेंच फलंदाज गुस्ताव मॅकॉनने (Gustav Mckeon) पुन्हा एकदा धमाका केला आहे. या धडाकेबाजफलंदाजाने युरोपियन T20 विश्वचषक पात्रता सामन्यात आणखी एक शतक झळकावलं आहे. वांटामध्ये स्वित्झर्लंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या या खेळाडूनं बुधवारी नॉर्वेविरुद्धही शतक झळकावले. त्यामुळे गुस्तावच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला. मॅकॉननं नॉर्वेविरुद्ध 101 धावा केल्या होत्या आणि स्वित्झर्लंडविरुद्ध या खेळाडूने 109 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. गुस्ताव मॅकॉनने सलग दोन टी-20 शतकांसह (century) एक मोठा विश्वविक्रम केला आहे. सलग दोन टी-20 शतके झळकावणारा गुस्ताव हा एकमेव क्रिकेटर आहे. गुस्ताव मॅकॉनने दोन डावात 210 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 17 षटकार आणि 10 चौकार बाहेर पडले आहेत. या फलंदाजाने स्वित्झर्लंडविरुद्ध 9 तर नॉर्वेविरुद्ध 8 षटकार मारले होते. दरम्यान, गुस्ताव मॅकॉन हा सध्या चांगलाच चर्चेत आहे.

गुस्तावचा व्हिडीओ पाहा

शतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला

स्वित्झर्लंडविरुद्ध शतक झळकावल्यानंतरही गुस्ताव आपल्या संघाच्या पराभवाचे कारण बनला होता. गुस्तावने गोलंदाजीत खराब कामगिरी करून फ्रान्सचा विजय नाकारला होता. त्या T20 सामन्यात गुस्तावला शेवटच्या षटकात 16 धावा वाचवायच्या होत्या. पण, तो करू शकला नाही. शेवटच्या चेंडूवर स्वित्झर्लंडला 4 धावांची गरज होती आणि गुस्तावने चौकार लगावला. परिणामी फ्रान्सने हा सामना एका विकेटने गमावला. मात्र, नॉर्वेविरुद्ध असे घडले नाही. गुस्तावने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीमध्ये 4 षटकात 27 धावा देत 3 बळी घेतले. फ्रान्सने नॉर्वेवर 11 धावांनी विजय मिळवला.

गुस्ताव मॅकॉनबद्दल बोलायचे तर या खेळाडूने आतापर्यंत फक्त तीन टी-20 सामने खेळले आहेत. तिन्ही सामन्यांमध्ये त्याच्या बॅटने अर्धशतक किंवा शतक झळकावले आहे. या खेळाडूने 3 सामन्यात 95 पेक्षा जास्त सरासरीने 286 धावा केल्या आहेत. स्ट्राइक रेट देखील 170 च्या पुढे आहे. हा खेळाडू थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असून गुस्तावच्या कोणत्याही देशांतर्गत क्रिकेट विक्रमाची माहिती नाही.

T20 विश्वचषक पात्रता सामन्यात आणखी एक शतक झळकावले आहे. वांटामध्ये स्वित्झर्लंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या या खेळाडूनं बुधवारी नॉर्वेविरुद्धही शतक झळकावले. त्यामुळे गुस्तावच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम झाला. मॅकॉननं नॉर्वेविरुद्ध 101 धावा केल्या होत्या आणि स्वित्झर्लंडविरुद्ध या खेळाडूने 109 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.