VIDEO, KL Rahul : केएल राहुलनं चाहत्यांची मने जिंकली, राष्ट्रगीतापूर्वी राहुलनं काय केलं? जाणून घ्या…

शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी भारताला कोणताही त्रास न होता पहिला वनडे जिंकण्यास मदत केली. शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या. वाचा...

VIDEO, KL Rahul : केएल राहुलनं चाहत्यांची मने जिंकली, राष्ट्रगीतापूर्वी राहुलनं काय केलं? जाणून घ्या...
केएल राहुल
Image Credit source: social
| Updated on: Aug 19, 2022 | 9:05 AM

नवी दिल्ली : भारताने झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्याची दमदार विजयाने सुरुवात केली. हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) यजमानांचा 10 गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला विजय नोंदवला. याशिवाय भारतीय कर्णधारानेही आपल्या एका सुंदर हावभावाने चाहत्यांची मने जिंकली. या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे शिखर धवन आणि शुभमन गिलच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 30.5 षटकात पूर्ण केले. जेव्हा खेळाडू मैदानावर येतात तेव्हा त्यांच्या तोंडात च्युइंगम असते. मैदानात उतरल्यावर राहुलही च्युइंगम चघळत होता, पण क्षेत्ररक्षणापूर्वी सर्व खेळाडू राष्ट्रगीतासाठी जमले तेव्हा राहुलने राष्ट्रगीताचा मान राखत तोंडातून च्युइंगम काढला. राहुलचा हा हावभाव चाहत्यांना खूप आवडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहा

गुरुवारी हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 189 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात धवन आणि गिल यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला.

हायलाईट्स

  1. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला विजय नोंदवला
  2. भारतीय कर्णधारानेही आपल्या एका सुंदर हावभावाने चाहत्यांची मने जिंकली.
  3. झिम्बाब्वेने भारतासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले
  4. अक्षर पटेल (24 धावांत 3 बळी) आणि प्रणभव कृष्णा (50 धावांत 3 बळी) यांनीही प्रत्येकी तीन बळी घेत झिम्बाब्वेला 40.3 षटकांत गुंडाळले.
  5. शिखर धवन आणि शुभमन गिलच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 30.5 षटकात टार्गेट पूर्ण केले
  6. दीपक चहरच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी भारताचा डाव 189 धावांत गुंडाळला.

शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी भारताला कोणताही त्रास न होता पहिला वनडे जिंकण्यास मदत केली.शिखर धवनने 113 चेंडूत 81 धावा केल्या, तर शुभमन गिलने 72 चेंडूत 82 धावा केल्या.

वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी भारताचा डाव 189 धावांत गुंडाळला. दुखापतीमुळे जवळपास सहा महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या चहरने 27 धावांत तीन बळी घेत यजमानांची आघाडी उद्ध्वस्त केली. अक्षर पटेल (24 धावांत 3 बळी) आणि प्रणभव कृष्णा (50 धावांत 3 बळी) यांनीही प्रत्येकी तीन बळी घेत झिम्बाब्वेला 40.3 षटकांत गुंडाळले.