IND vs ENG: जॉनी बेयरस्टो बनला सुपरमॅन, हवेत उडी घेत एका हातात पकडला झेल, पाहा VIDEO

| Updated on: Aug 27, 2021 | 7:46 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावा करत भारतावर तब्बल 354 धावांची एक तगडी आघाडी मिळवली आहे.

IND vs ENG: जॉनी बेयरस्टो बनला सुपरमॅन, हवेत उडी घेत एका हातात पकडला झेल, पाहा VIDEO
Johny bairstow take Kl rahuls catch
Follow us on

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. दुसऱ्या कसोटीत लॉर्ड्स मैदानात मिळवलेल्या अप्रतिम विजयानंतर तिसऱ्या कसोटीतही भारत तशीच अप्रतिम कामगिरी करेल असे सर्वांना वाटत होते. पण भारताचा सर्व संघ पहिल्या डावात 78 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर गोलंदाजीतही खास कामगिरी करु शकला नाही. इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या जोरावर तब्ब 432 धावा करत भारतावर 354 धावांची आघाडी मिळवली. ज्यानंतर भारत फलंदाजीला आला. लॉर्ड्सचा शतकवीर केएल राहुल आजही कमाल करेल असे वाटत असताना इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow)  एक उत्कृष्ट झेल पकडत राहुलला तंबूत धाडलं.

बेयरस्टोने दुसऱ्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत असता भारताचा सलामीवीर केएल राहुलचा झेल पकडला. हा झेल इतका भारी होता की तो पाहताच प्रेक्षकांसह खेळाडूही आश्चर्यचकीत झाले. भारताचा दुसरा डाव सुरु असताना 19 वी ओव्हर इंग्लंडचा क्रेग ओवरटन टाकत होता. शेवटच्या चेंडूवर ओवरटनने ऑफ स्टम्पजवळ बॉल टाकला आणि तो थांबवण्याच्या नादात राहुलच्या बॅटला लागून मागच्या दिशेने गेला. हीच संधी न सोडता स्लीपमध्ये उभा असलेल्या बेयरस्टोने अप्रतिम उडी घेत एका हातात झेल पकडला. या कॅचचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतावर 354 धावांची आघाडी

तिसरी कसोटी सुरु असेलेल मैदान फलंदाजीसाठी पोषक असल्याने या खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांना फार चांगली कामगिरी करता आली नाही. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी घेतले. भारताला पहिली विकेट त्यानेच मिळवून दिली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. जो रुटला त्यानेच बाद केलं. त्याशिवाय फिरकीपटू रवींद्र जाडेजाने दोन आणि मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. इशांत शर्माला बळींचं खातंही उघडता आलं नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 432 धावांवर समाप्त झाला असून त्यांनी भारतावर 354 धावांची आघाडी मिळवली आहे.

हे ही वाचा

IND vs ENG 3rd Test Day 3 Live: भारतीय फलंदाजाची बचावात्मक खेळी, रोहित-पुजारा जोडी मैदानात

IND vs ENG : रोहितची एक चूक भारताला पडली महाग, तिसऱ्या कसोटीत मोठं नुकसान, पाहा VIDEO

IND vs ENG : जो रुट आणि विराट कोहलीमध्ये मैदानाबाहेरही झाला होता वाद, समोर आली खळबळजनक माहिती

(Video of India vs Englands third test Jonny bairstow take one hand catch of Kl rahul in slip)