VIDEO : टी-20 वर्ल्ड कपच्या व्हिडीओत रोहित नाही? व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक

टी-20 वर्ल्ड कपच्या व्हिडीओत रोहित नाही, हे कळताच आधी फॅन्सनं व्हिडीओ पाहिला आणि त्यानंतर....

VIDEO : टी-20 वर्ल्ड कपच्या व्हिडीओत रोहित नाही? व्हिडीओ पाहून फॅन्स शॉक
विराट कोहली
Image Credit source: social
| Updated on: Oct 06, 2022 | 7:05 PM

नवी दिल्ली : 23 ऑक्टोबरची क्रिकेटविश्वातून (Cricket) वाट पाहिली जातेय. यासाठी कोणते खेळाडू खेळणार हे बीसीसीआयनं (BCCI) घोषित केलंय. मात्र, ऐनवेळी काही बदल होतातच. हे देखील आपल्याला माहिती आहे. टीम इंडियाचा (Team India) संघ या महत्वाच्या सामन्यासाठी रवाना देखील झाला आहे. विशेष म्हणजे सामन्या आधीच वेगवेगळे व्हिडीओ समोर येतायत. यातच एका व्हिडीओची चांगलीच चर्चा देखील आहे.

हा व्हिडीओ पाहा

टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाला गेली. यानंतर आता टीव्हीवर याची जाहिरात देखील येत आहे. तुम्हाला माहिती आहे का, की 2007 पहिला टि-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आतापर्यंत भारताला हा वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे आताच्या विश्वचषकाकडे याच दृष्टीनं पाहिलं जातंय.त्यामुळे आता खेळाडूंना चांगलं खेळून टीम इंडियाला विजय मिळवून द्यायचा आहेय.

हा व्हिडीओ पाहा

विशेष बाब म्हणजे या जाहिरातीत टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली दिसतोय. हा अनेक चाहत्यांसोबत जुन्या बसला चमकवताना दिसतोय. यामध्ये लिहिलंय विजय रथ. हे चमकल्यानंतर कोहलीनं बस सुरू केली आणि यावेळी प्रतीक्षा संपणार असल्याचे संकेतही दिले आहे. पण, यात रोहित दिसत नाही. यामुळे फॅन्स देखील प्रश्न विचरत आहेत.

हा व्हिडीओ पाहा

ट्विटरवरही हा नवा व्हिडिओ खूप पाहिला जातोय.अनेक चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि कर्णधार रोहित शर्माला या जाहिरातीत का घेण्यात आले नाही, असा एकच प्रश्न विचारला.

अशाच काही कमेंट्स तुम्हाला वाचता येतिल.चाहत्यांना कोहलीला पाहून आनंद होतोय पण त्याचवेळी काहींना आश्चर्यही वाटते की कर्णधाराला का घेतले नाही.