Vinod Kambli: वर्तनामुळे क्रिकेटमधल्या वाया गेलेल्या टॅलेंटची गोष्ट, मैदानापेक्षा बाहेरच्या गोष्टींचीच जास्त चर्चा

| Updated on: Jan 18, 2022 | 7:00 AM

विनोद कांबळी सुद्धा प्रतिभासंपन्न फलंदाज होता. पण त्याच्या वर्तनामुळे क्रिकेटमधलं हे टॅलेंट वाया गेलं, असं क्रिकेटचे जाणकार सांगतात.

Vinod Kambli: वर्तनामुळे क्रिकेटमधल्या वाया गेलेल्या टॅलेंटची गोष्ट, मैदानापेक्षा बाहेरच्या गोष्टींचीच जास्त चर्चा
Follow us on

मुंबई: विनोदा कांबळीचा (Vinod Kambli) जन्म 18 जानेवारी 1972 रोजी झाला. विनोद कांबळी त्याच्या क्रिकेट कौशल्यापेक्षा (Cricket skill) वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. सचिन तेंडुलकरबरोबर त्याची घनिष्ट मैत्री सुद्धा नेहमी चर्चेचा विषय ठरली. विनोद कांबळी सुद्धा प्रतिभासंपन्न फलंदाज होता. पण त्याच्या वर्तनामुळे क्रिकेटमधलं हे टॅलेंट वाया गेलं, असं क्रिकेटचे जाणकार सांगतात.

1 विनोद कांबळी भारताकडून फक्त 17 कसोटी आणि 104 वनडे सामने खेळला. कांबळीचा जन्म मुंबईत एका सामान्य कुटुंबात झाला. कांजूरमार्ग येथे चाळीमध्ये विनोद कांबळी रहायचा. त्याचे वडिल गणपत मॅकेनिक होते. कांबळीच्या कुटुंबात एकूण सात जण होते. कांबळी सुद्धा रमाकांत आचरेकर सरांचा शिष्य. शिवाजी पार्कवर नेटमध्ये जाण्यासाठी विनोद कांबळी दररोज कांजूरमार्ग ते दादर ट्रेनने प्रवास करायचा.

2 शालेय क्रिकेट खेळताना कांबळी आणि सचिन तेंडुलकरची 664 धावांची भागीदारी जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. शारदाश्रमने त्या सामन्यात दोन विकेट गमावून 748 धावांची भागीदारी केली. विनोद कांबळी 349 धावांवर नाबाद होता. त्या सामन्यात कांबळीने जोरदार गोलंदाजी सुद्धा केली होती. 37 धावात सहा विकेट असा त्याचा स्पेल होता. कांबळीच्या भेदक गोलंदाजीमुळे सेंट झेवियर्सचा संघ 154 धावात ऑलआऊट झाला होता.

3 सचिन तेंडुलकरने 1988 साली गुजरात विरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केले. कांबळीला रणजीमध्ये पदार्पण करण्यासाठी आणखी वर्षभर वाट पहावी लागली. पण त्याने सुद्धा गुजरात विरुद्धच्या सामन्याने रणजीमध्ये पदार्पण केलं. 1989 साली तेंडुलकर पाकिस्तान दौऱ्यात वकार, अक्रम यांच्या पेस बॉलिंगचा सामना करत होता. त्यावेळी कांबळीची आशिय करंडक स्पर्धेसाठी अंडर-19 संघात निवड झाली होती. सौरव गांगुली कांबळीचा सहकारी होता.

4 विनोद कांबळीने 1989 साली गुजरात विरुद्धच्या सामन्याने रणजीमध्ये पदार्पण केले. त्यावेळी विनोदने षटकार मारुन त्याच्या रणजी करीयरची सुरुवात केली.

5 फेब्रुवारी-मार्च 1993 मध्ये कांबळीने इतिहास रचला. त्याने लागोपाठ दोन द्विशतक झळकावली. घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडेवर इंग्लंडविरुद्ध त्याने आधी 224 धावा केल्या. त्यानंतर दिल्लीत झिम्बाब्वे विरुद्ध त्याने 227 धावा केल्या.

6 त्या डबल द्विशतकानंतर कांबळीने पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात जुलै 1993 मध्ये 125 धावांची शतकी खेळी केली. महत्त्वाचं म्हणजे कांबळीने ही तीन वेगवेगळ्या देशांविरुद्ध झळकावली.

7 करीयरच्या सुरुवातीलाच कांबळीने हा जोरदार खेळ दाखवला होता. 1 हजार धावा करण्यासाठी विनोद कांबळीला फक्त 14 डाव लागले होते.

8 18 जानेवारी 1993 रोजी बर्थ डे च्याच दिवशी विनोद कांबळीने जयपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. सचिन तेंडुलकर, रॉस टेलर या खेळाडूंनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शतकी खेळी केली आहे.

9 1996 च्या वर्ल्डकप स्पर्धेच इडन गार्डन्सवर श्रीलंके विरुद्ध उपांत्य फेरीचा सामना सुरु होता. अचानक भारताचा डाव गडगडला. त्यावेळी कांबळी ड्रेसिंग रुममध्ये रडत जाताना दिसला. याच सामन्यानंतर कांबळीचे करीयर उतरणीला लागले. 1996 ते 2000 या दरम्यानच कांबळी त्याची शेवटची वनडे खेळला.

10 विनोद कांबळीने बॉलिवूडमध्ये सुद्धा नशीब आजमावून पाहिले. 2002 मध्ये सुनील शेट्टीच्या ‘अनर्थ’ मध्ये कांबळी झळकला. त्यानंतर 2009 मध्ये अजय जाडेजासह ‘पल पल दील के साथ’ या चित्रपटात त्याने भूमिका केली.

(Vinod Kambli the biggest wastes of talent in cricket history)