Virat Kohli Reaction : उमेशची धुलाई होताना विराटची रिअ‍ॅक्शन व्हायरल

| Updated on: Sep 21, 2022 | 3:47 PM

Virat Kohli Reaction : काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.  टीम इंडियातील काही खेळाडूंना नेटिझन्सनं लक्ष्यही केलं. यात विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल होतोय.

Virat Kohli Reaction : उमेशची धुलाई होताना विराटची रिअ‍ॅक्शन व्हायरल
विराट कोहली
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : पहिल्याच टी-20 सामन्यात (IND vs AUS 1st T20) भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी ज्यांच्याकडून आशा होती, अशा खेळाडूंनी केलेली सुमार कामगिरी देखील यावेळी चर्चेचा विषय ठरली. तर नेटिझन्सकडून टीम इंडियातील (Team India) काही खेळाडूंना टीकेला सामोरं जावं लागलं. यावेळी टीम इंडियावर झालेली टीका आणि विराटच्या कामगिरीवरही नेटकऱ्यांनी संतापानं लिहिलंय.

खेळाडूंवर टीका

हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावरही सोशल मीडियावर मीम्स बनलेत. सामन्यादरम्यान गोलंदाजांची झालेली धुलाई पाहून टीम इंडियातील अनेक खेळाडूंच्या रिअ‍ॅक्शन पाहण्यासारख्या होत्या. यात विराट कोहलीची (Virat Kohli) रिअ‍ॅक्शन व्हायरल झाली आहे.

हे ट्विट पाहा

नेमकं काय झालं?

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फलंदाजी करत होते. यावेळी उमेश यादव हा गोलंदाजीसाठी समोर आला. तो दुसऱ्या ओव्हरसाठी आला होता. यावेळी धावपट्टीवर असलेल्या कॅमरुन ग्रीननं पहिल्या चार चेंडूत चौकार लगावले. यावेली फिल्डींग करत असलेल्या विराट कोहलीची रिअ‍ॅक्शन एकमद वेगळी होती. उमेश यादवची धुलाई पाहून विराटची ही रिअ‍ॅक्शन चांगलीच व्हायरल झाली.

अनेकांनी असंही म्हटलंय…

फोटो व्हायरल

विराट रागावलेल्या नजरेनं बघत होता. त्याच्या रिअ‍ॅक्शनचे फोटो ट्विटरवर चांगलेच व्हायरल झाले. तर यावर नेटिझन्सकडून वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स देखील बनले.

व्हायरल ट्विट

नेटवर कोहलीवर बनलेल्या मीम्समध्ये वेगवेगळे लिहिले गेले. यात एकानं लिहिलं की, ‘कोहलीच्या रिअ‍ॅक्शनवर जर त्याला म्हटलं की सगळ्या गोलंदाजांची धुलाई होतेय. एक-दोन ओव्हर तू घे, तर काय झालं असतं.’

असेही फोटो व्हायरल होतायत

तर दुसऱ्या एकानं विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे. काहींनी आशिया चषकातील दाखला देत. तेव्हा जमलं आता का नाही, असंही म्हटलंय. तर अनेकांनी यावेळी कोहलीच्या या रिअ‍ॅक्शनवर भरभरून लिहित टीकाही केली आहे.