IND vs NZ 1st ODI: 9 महिन्यानंतर मिळाली बॅटिंगची संधी, जमिनीवर झोपून-झोपून मारले शॉट्स

| Updated on: Nov 25, 2022 | 1:12 PM

IND vs NZ 1st ODI: 3 फोर, 3 सिक्स त्याच्यामुळे टीम इंडिया 300 पार

IND vs NZ 1st ODI: 9 महिन्यानंतर मिळाली बॅटिंगची संधी, जमिनीवर झोपून-झोपून मारले शॉट्स
ind vs nz
Image Credit source: Screengrab
Follow us on

ऑकलंड: 3 सिक्स, 3 फोर….वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या 6 चेंडूत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची हालत खराब केली. या 6 शॉट्समध्ये वॉशिंग्टन सुंदरने कमाल केली. त्याच्याकडून अशा कामगिरीची कोणी अपेक्षा केली नव्हती. संजू सॅमसन आऊट झाल्यानंतर हा लेफ्टी बॅट्समन मैदानात उतरला. असं वाटलं होतं की, सुंदर विकेटवर सेट झालेल्या श्रेयस अय्यरला स्ट्राइक देईल. पण सुंदरचा प्लान काही वेगळाच होता. सुंदरने अवघ्या 16 चेंडूत 37 धावा चोपल्या.

लास्ट ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग

वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडकडून चांगली गोलंदाजी करणाऱ्या मॅट हेनरीचा समाचार घेतला. शेवटच्या ओव्हरमध्ये सुंदरने 2 चौकार आणि एक जबरदस्त षटकार ठोकला. त्याच्या इनिंगच्या बळावर टीम इंडियाची धावसंख्या 300 पार पोहोचली.

वॉशिंगटन सुंदरचे कमालीचे शॉट्स

वॉशिंग्टन सुंदर आपल्या इनिंगमध्ये 16 चेंडू खेळला. या दरम्यान त्याने सहा वेळा चेंडू सीमारेषेपार पाठवला. सुंदरने मॅट हेनरीच्या एका चेंडूवर झोपून चौकार मारला. हेनरीने चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकला होता. या चेंडूला सुंदरने यॉर्करऐवजी लोअर फुलटॉस बनवला. सुंदरने स्कूप खेळून चौकार लगावला. जवळपास विकेटवर झोपून त्याने हा फटका खेळला.

9 महिन्यानंतर बॅटिंगसाठी उतरला मैदानात

सुंदरच्या या फटक्याने सूर्यकुमार यादवची आठवण करुन दिली. तो अशा प्रकारचे शॉट्स मारण्यासाठी ओळखला जातो. वॉशिंग्टन सुंदर 9 महिन्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्याने याआधी 11 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध फलंदाजी केली होती.

ऑकलंडमध्ये भारताची सुपर फलंदाजी

ऑकलंड वनडेमध्ये भारताने जबरदस्त फलंदाजी केली. धीम्या सुरुवातीनंतर टीम इंडियाचा 306 धावांपर्यंत पोहोचला. शिखर धवन 72, शुभमन गिल 50 धावांची इनिंग खेळला. श्रेयस अय्यरने 80 आणि संजू सॅमसनने 36 धावा केल्या. ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादवची बॅट चालली नाही. पंतने 15 आणि सूर्यकुमारने 4 धावा केल्या. न्यूझीलंडकडून साऊदी आणि फर्ग्युसनने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या.