World Cup 2023 साठी टीम इंडियाच्या माजी खेळाडूने निवडला संघ, ‘या’ घातक खेळाडूची संघात एन्ट्री!

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करणं बीसीसीआयसाठी अग्निपरीक्षा असणार आहे. तोडीस तोड खेळाडूंचा भरणा आता असलेला पाहायला मिळत आहे. युवा खेळाडूंनीही दमखम दाखवला असल्याने नेमकी संघात कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

World Cup 2023 साठी टीम इंडियाच्या माजी खेळाडूने निवडला संघ, या घातक खेळाडूची संघात एन्ट्री!
| Updated on: Jul 24, 2023 | 9:17 PM

मुंबई : यंदाचा वनडे वर्ल्ड कप 2023 भारतामध्ये होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. टीम इंडियाला मायभूमीत पराभूत करणं सोपी गोष्ट नाही. वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर करणं बीसीसीआयसाठी अग्निपरीक्षा असणार आहे. भारताकडे तोडीस तोड खेळाडूंचा भरणा आहे. युवा खेळाडूंनीही दमखम दाखवला असल्याने संघात नेमकी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण काही सीनिअर खेळाडूंचा हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याचं बोललं जात आहे. अशातच भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर याने वर्ल्ड कप 2023 साठी संघ निवडला आहे.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे ओपनर असणार तर शिखर धवन राखीव ओपनर असणार आहे. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या नंबरवर तर चौथ्या स्थानी श्रेयस अय्यर आणि पाचव्या नंबरवर के. एल. राहुल आहे. हार्दिक पंड्या सहाव्या स्थानी त्यानंतर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल तीन स्पिनर माझ्या संघात असणार आहेत. यातील पंड्याने जर 7-8 ओव्हर्स टाकल्या तर संघ संतुलित होऊ शकतो, असा विश्वास वसीम जाफरने व्यक्त केला आहे.

बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी असणार आहेत. यामध्ये बुमराह आणि सिराज यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देईल. बॅकअप म्हणून, ते शार्दुल ठाकूरला गोलंदाज म्हणून आणि संजू सॅमसनला हा कीपर म्हणून मी संघात त्याला स्थान दिल्याचं जाफरने सांगितलं आहे.

वसीम जाफरने वर्ल्ड कप 2023 साठी निवडलेला संघ

रोहित शर्मा )कर्णधार), शुबमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकूर.