
गल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत क्रिकेटची क्रेझ दिवसेंदिवेस वाढतेय. कसोटी, वनडेनंतर आता 2 दशकांपासून टी 20 क्रिकेटची चलती पाहायला मिळतेय. टेस्ट आणि वनडे फॉर्मेटची लोकप्रियता टी 20 क्रिकेटच्या काळातही कायम आहे. मात्र वनडे आणि टेस्टच्या तुलनेत चाहत्यांचा ओढा हा टी 20 क्रिकेटकडे जास्त आहे. खेळाडूंना फॉर्मेटनुसार खेळण्याची पद्धत, आक्रमकता, वेग या आणि अशा अनेक बाबतीत कमी जास्त प्रमाणात गरजेनुसार बदल करावा लागतो. खेळाडूंना परिस्थिती आणि फॉर्मेटनुसार खेळावं लागतं. टी 20 क्रिकेटमध्ये धावा करण्याचा वेग हा कसोटी आणि वनडे फॉर्मेटच्या तुलनेत कितीतरी पट जास्त आहे. फॉर्मेटनुसार खेळण्याची पद्धत आणि इतर संबंधित मुद्द्यांमध्ये बदल पाहायला मिळतो. मात्र या सर्व मुद्द्यांना फिटनेसचा मुद्दा अपवाद आहे. खेळाडूंसाठी फिटनेस किती महत्त्वाचा मु्द्दा आहे हे क्रीडा चाहत्यांना पर्यायाने क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगायची गरज नाही. काही दशकांआधी फक्त फिटनेस टेस्ट इतकाच विषय होता. मात्र क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात बदल...