
Sachin Tendulkar Scored Most Runs in International Cricket: क्रिकेटमधील देव, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर याचा हा धावांचा डोंगर अजूनही शाबूत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने कसोटी, एकदिवशी आंतरराष्ट्रीय सामने आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात मिळून 34,357 धावा ठोकल्या आहेत. त्याचा हा रेकॉर्ड अद्याप कोणीही मोडू शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. पण त्याचा हा विक्रम कोणाला मोडता आलेला नाही. दोन दशकांपेक्षा अधिक काळ मैदानावर टिकूनच राहिला नाही तर त्याची सातत्यपूर्ण खेळीने त्याने हा मोठा पल्ला गाठला आहे. काही उमद्या खेळाडूंना हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची मोठी संधी आहे. पण त्यासाठीची सातत्यपूर्ण खेळी, मेहनत आणि क्रिकेटमधील कौशल्य त्याला आजमावता आले पाहिजे.
सचिन तेंडूलकरचे करिअर
सचिन तेंडुलकरने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2013 मध्ये तो निवृत्त झाला. या मोठ्या कालावधीत त्याने 200 कसोटी सामने, 463 ODIs आणि एक T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. 30 वर्षांहून अधिक काळ त्याने धावपट्टी आणि अनेक मैदानं गाजवली ही त्याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आजकाल अनेक खेळाडूंना फिटनेस फॉर्मच्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. तर नव्या दमाचे खेळाडू मैदानात येत असल्याने अनेक दिग्गज खेळाडू संन्यास घेत बाजूला होत आहे.
प्रत्येक फॉर्म्याटमध्ये किती धावा?
सचिन तेंडूलकर याने कसोटी क्रिकेटमध्ये 15,921 धावा, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18,426 रन काढले. तर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 10 धावा केल्या आहेत. ODI मधील सर्वाधिक धावांचा त्याचा रेकॉर्ड वाखाणला जातो. या धावांच्या डोंगरमुळे तो आजही महान फलंदाजांच्या फळीत चमकून उठतो. त्याला उगीच क्रिकेटचा देव म्हटल्या जात नाही. अनेक कठीण परिस्थितीत त्याने भारतीय संघासाठी बहारदार कामगिरी केली. आयपीएल सारख्या फॉर्म्याटमध्ये ही त्याने त्याच्या खेळाची चुणूक दाखवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
शतकं ठोकणारा शतकवीर
100 आंतरराष्ट्रीय शतकं ठोकणारा सचिन तेंडुलकर हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरला. केवळ हाच रेकॉर्ड नाही तर, 30 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय फलंदाज होता. एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या सर्व विक्रमामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर तो उभारू शकला. हा त्याचा रेकॉर्ड जगातील अनेक दिग्गज फलंदाजांना अद्याप मोडता आलेला नाही, हे विशेष.