AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi इतिहास रचणार? 299 धावांची गरज, देवदत्त पडिक्कलचा तो विक्रम तुटणार?

Vaibhav Suryavanshi Record: भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी नवीन विक्रमाच्या अगदी जवळ आहे. वैभवने अवघ्या 14 व्या वर्षीच नाव काढलं आहे. त्याने एका वर्षात अनेक विक्रम आणि जबरदस्त खेळी स्वतःच्या नावावर नोंदवली आहे. आता वैभवसमोर अजून एक मोठं लक्ष्य आहे. तो हा विक्रम रचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Vaibhav Suryavanshi इतिहास रचणार? 299 धावांची गरज, देवदत्त पडिक्कलचा तो विक्रम तुटणार?
वैभव सूर्यवंशीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 14, 2026 | 12:31 PM
Share

Vaibhav Suryavanshi Record: भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी सातत्याने त्याच्या नावावर विविध रेकॉर्ड करत आहे. वैभवने 14 व्या वर्षीच नाव काढले. गेल्या एका वर्षात एकाहून एक सरस कामगिरी त्याने केली. आता वैभव एक मोठा विक्रम रचण्याच्या तयारीत आहे. तो टी20 इतिहासात सर्वात वेगवान फलंदाज म्हणून ओळख निर्माण करण्यापासून तो अवघ्या 299 धावा दूर आहे. सूर्यवंशी U19 क्रिकेटमध्ये पदार्पणापासून चर्चेत आहे. त्याने राजस्थान रॉयल्स आणि बिहारसाठी क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड तोडले.

टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा सूर्यवंशी IPL मध्ये राजस्थानसाठी खेळत आहे. तर तर आयपीएल 2025 मध्ये सर्वात कमी वयाचा फलंदाज म्हणून त्याची नोंद झाली आहे. वैभवने U19 क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड नावावर केले आहे. तो येत्या विश्वचषकासाठी भारताच्या U19 क्रिकेट संघाचा भाग आहे. आयसीसी इव्हेंटमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. तो आता आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात खेळणार आहे.

वैभव सूर्यवंशी विक्रमाच्या जवळ

वैभव सूर्यवंशी हा पुढील पाच डावात 299 धावा करून टी20 मध्ये महाविक्रम रचू शकतो. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत 18 टी 20 सामन्यांमध्ये 701 धावा चोपल्या आहेत. 204.37 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत सूर्यवंशीने क्रिकेट करिअरमध्ये 62 षटकार आणि 53 चौकार लगावले आहेत. त्याच्या नावे एक शतक आणि तीन अर्धशतक झळकली आहेत. त्याने IPL 2025 मध्ये सात सामने खेळले. या 7 सामन्यात त्याने 252 धावा चोपल्या.

T20 मध्ये 1000 धावा करणारे सर्वात वेगवान फलंदाज(डाव)

शॉन मार्श-23

ब्रँड हॉज – 23

मॅथ्यू हेडन-24

सबावून दाविजी-24

देवदत्त पडिक्कल-25

देवदत्त पडिक्कलचा तो रेकॉर्ड तुटणार?

जर वैभव सूर्यवंशीने टी20 च्या पुढील पाच डावात 299 धावा केल्या तर तो 1000 धावा करणारा अजून एक वेगवान खेळाडू होईल. या यादीत ब्रँड हॉज आणि शॉन मार्श सध्या या यादीत टॉपवर आहेत. जर सूर्यवंशी पुढील पाच डावात 299 धावा करू शकला तर तो इतिहास रचेल. देवदत्त पडिक्लचा रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी मात्र पुढील सर्व डावात वैभव याला दमदार खेळी खेळावी लागेल. त्याला कमीत कमी इतक्या धावा काढव्या लागतील. तर तो हा रेकॉर्ड मोडू शकतो. वैभव सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने हा फॉर्म टिकवला तर तो सहज हा विक्रम येत्या दिवसात मोडीत काढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील प्रभाग 38 मध्ये वस्तूंचे वाटप! वसंत मोरेंचा आरोप
पुण्यातील प्रभाग 38 मध्ये वस्तूंचे वाटप! वसंत मोरेंचा आरोप.
गोंदियात बिबट्याची दहशत की AI मुळे अफवा?
गोंदियात बिबट्याची दहशत की AI मुळे अफवा?.
पालिक कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले? मनसेचा गंभीर आरोप
पालिक कर्मचाऱ्यांनी भाजप उमेदवारासाठी पैसे वाटले? मनसेचा गंभीर आरोप.
अधिकाऱ्यांची विश्रांती अन् विनातपासणी वाहनांची संभाजीनगरात एन्ट्री!
अधिकाऱ्यांची विश्रांती अन् विनातपासणी वाहनांची संभाजीनगरात एन्ट्री!.
ठाणे महापालिका निवडणुकीच्या 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू
ठाणे महापालिका निवडणुकीच्या 215 मतदान केंद्रांसाठी EVM वाटप सुरू.
शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप
शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना तिळगूळाचं वाटप.
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
वडापाव उत्पनाचं साधन, त्याचा...; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य.
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी
माते, महापालिकेत आमचीच सत्ता येऊ दे.. ठाकरे बंधू आज मुंबादेवीच्या चरणी.
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा
बदडण्याचं प्रमाण वाढू शकतं.. मतदानाच्या आधीच संजय राऊत यांचा थेट इशारा.
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद
नागपूरकरांसाठी मोठी बातमी! 15 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद.