AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने माझी फसवणूक केली..; देश सोडून इराणला निघाली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं काय घडलं?

इराणबद्दल बोलल्याने आणि काही निदर्शनांमध्ये भाग घेतल्याने मुंबईत बरेच मित्र-मैत्रिणी गमावल्याचं या अभिनेत्रीने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर पुन्हा इराणला जाण्याची तयारी केल्याचंही ती म्हणाली आहे.

भारताने माझी फसवणूक केली..; देश सोडून इराणला निघाली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं काय घडलं?
Mandana KarimiImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2026 | 10:30 AM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनेई यांच्या मृत्यूवर अभिनेत्री मंदाना करिमीने आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता तिने असं काही वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंदानाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारत सोडून तिच्या मायदेशीर इराणला जाण्याचं वक्तव्य केलं आहे. ‘भाग जॉनी’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मंदाना करिमीने ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत भारत आणि इराणबद्दल मोकळेपणे भाष्य केलं आहे.

या मुलाखतीत मंदाना म्हणाली, “सुरक्षेच्या कारणास्तव मी भारत सोडतेय. माझ्यासाठी हे अत्यंत कठीण आहे. फार कमी वयात मी इथे आली होती आणि आता इथून जाण्याची तयारी करत आहे. भारताने माझी फसवणूक केली आणि गेल्या दोन महिन्यांपासून मला फार एकटं वाटू लागलं आहे. यामागचं कारण म्हणजे मी इराणबद्दल मोकळेपणे बोलले. यामुळे मी माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना गमावलं आहे. ते माझ्यापासून दुरावले गेले आहेत. अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात या देशाने मला बऱ्याच संधी दिल्या आहेत. त्यासाठी मी या देशाची कायम आभारी असेन.”

View this post on Instagram

A post shared by RK (@rohitkhilnani)

“खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये दुसऱ्यांना सत्तेत आणण्याचा निर्णय घेतला जात आहे. मी बऱ्याच काळापासून स्वतंत्र इराणचं स्वप्न पाहत आले आहे. जिथे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळू शकेल आणि ते कॉलेजमध्ये शिकू शकतील, त्यांच्या आवडीचे कपडे परिधान करू शकतील. हे जसं शक्य होईल, तसं मी इराणला परत जाईन. मी बॅग भरले आहेत आणि सर्व तयारी झाली आहे. आता आम्ही उत्सव साजरा करणार आहोत. कारण इतक्या वर्षांपासून आम्ही जगाला मदत करण्याची विनंती करत आहोत. ही इराणी राजवण मध्य पूर्वेतील कर्करोगासारखी आहे. आम्ही 48 वर्षांहून अधिक काळापासून लढत आहोत”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

भारतीय सिनेसृष्टीत मंदानाला खरी ओळख सलमान खानच्या लोकप्रिय ‘बिग बॉस’ या शोमुळे मिळाली. बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिला काही बॉलिवूड चित्रपटांचे ऑफर्स मिळाले.

Follow Us
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?