AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी दोन नावं चर्चेत

आयर्लंड दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. ही मालिाक 26 ते 28 जून दरम्यान होणार आहे. त्यामुळे 17 जूनपर्यंत संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. असं असताना भारतीय संघ कोणाच्या नेतृ्त्वात आयर्लंडला जाणार? याबाबत खलबतं सुरू झाली आहेत.

आयर्लंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी दोन नावं चर्चेत
आयर्यंड दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेपूर्वी दोन नावं चर्चेतImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 02, 2026 | 7:22 PM
Share

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. ही मालिका 26 जूनपासून सुरू होणार आहे. 26 जून आणि 28 जून असे दोन सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी भारताचा संघ 17 जूनपर्यंत जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या मालिकेसाठी भारताचा नवा संघ पाठवण्याच विचार सुरू आहे. भविष्याचा वेध घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलली जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर यांची नावं चर्चेत आहे. संजू सॅमसन टी20 वर्ल्डकपनंतर आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. आयपीएलच्या एका पर्वात दोन शतकं झळकवणारा संजू एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच त्याने राजस्थान रॉयल्सचं नेतृ्त्वही सांभाळलं आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे.

श्रेयस अय्यर देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यरने कर्णधार आणि फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात केकेआरने 2024 मध्ये जेतेपद पटकावलं आहे. तर 2025 मध्ये पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहोचवण्यात त्याला यश आलं होतं. यंदाही प्लेऑफच्या शर्यतीत संघ होता. पण थोडक्यासाठी चौथं स्थान हुकलं. श्रेयस अय्यर फॉर्मात आहे. पण श्रेयस अय्यर 2023 पासून एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडे कर्णधारपद सोपण्यासाठी बीसीसीआयला विचार करावा लागेल.

कर्णधार सूर्यकुमार यादवच्या संघातील अडचणीत आलं आहे. खरं तर त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. पण आयपीएलच्या कामगिरीवर हा निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे सूर्यकुमार यादवला एक संधी दिली जाऊ शकते. पण त्याचं वाढतं वय पाहता 2028 टी20 वर्ल्डकपसाठी नवं नेतृत्व तयार करणं आवश्यक आहे. त्यामुळे टी20 संघातून वगळलं जाण्याची शक्यता आहे. एशियन्स गेम्सच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या यादीतूनही सूर्यकुमारला वगळलं आहे.

दुसरीकडे, आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकलेल्या पंधरा वर्षीय वैभव सूर्यवंशीचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी