AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकीला माफी नाही..! अभिषेक शर्माला कान पकडून उठाबशा काढव्या लागल्या, झालं असं की… Video

अभिषेक शर्मा भारतीय टी20 संघाचा हुकूमाचा एक्का आहे. आक्रमक सुरूवात करून त्याच्या हातखंडा आहे. नुकताच अभिषेक शर्मा 26 वर्षांचा झाला असून वाढदिवस साजरा केला. या दिनाचं औचित्य साधत मेंटॉर युवराज सिंगने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चुकीला माफी नाही..! अभिषेक शर्माला कान पकडून उठाबशा काढव्या लागल्या, झालं असं की... Video
चुकीला माफी नाही..! अभिषेक शर्माला कान पकडून उठाबशा काढव्या लागल्या, झालं असं की... VideoImage Credit source: PTI
| Updated on: Sep 04, 2026 | 3:43 PM
Share

भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्मा 26 वर्षांचा झाला असून 27व्या वर्षात पदार्पण केलं आहे. अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक शैलीने टी20 क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. खरं तर अभिषेक शर्मा स्ट्राईक असला की गोलंदाजांची भंबेरी उडते. त्याच्या आक्रमक शैलीचं कारणही तसंच आहे. युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक शर्माने क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. पण अभिषेक शर्माने एखादी चूक केली तर युवराज सिंग त्याला वेळीच रोखतो किंवा सोशल मीडियावरून शाळा घेतो. त्यामुळे गुरूशिष्याचं नातं सर्वांना परिचयाचं आहे. असं असताना त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मेंटॉर युवराज सिंगने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात अभिषेक शर्मा उठाबशा काढताना दिसत आहे. युवराज सिंगने त्याला उठाबशा काढण्यास भाग पाडलं आहे. इतकंच काय तर तशी चूक पुन्हा घडणार नाही याचं आश्वासनही घेतलं आहे. कारण अभिषेक शर्मा त्यामुळे लवकर बाद होतो. चला जाणून घेऊयात या व्हिडीओत काय आहे खास…

अभिषेक शर्माने युवराज सिंगला नेमकं काय सांगितलं?

अभिषेक शर्मा आक्रमकपणे सुरूवात करतो. समोर कोण गोलंदाज आणि विकेट पडेल याची काळजी करत नाही. पण मागच्या काही महिन्यात अभिषेक शर्माने आपल्या शैलीत थोडा बदल केला आहे. आता वेळ घेऊन फलंदाजी करत असतो. असं असताना युवराज सिंगने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओत अभिषेक शर्मा उठाबशा काढताना दिसत आहे. उठाबशा काढताना युवराज सिंग त्याच्याकडून झालेल्या चुका परत होऊ नयेत, यासाठी त्या वदवूनही घेत आहे. ‘मी पहिल्या चेंडूवर आक्रमक फटका मारणार नाही. मी पहिला चेंडू हवेत मारणार नाही. मी टाईम घेऊन फलंदाजी करेन.’, असं युवराज सिंग त्याच्याकडून वदवून घेत आहे.

अभिषेक शर्माच्या नावावर आतापर्यंत या विक्रमांची नोंद

अभिषेक शर्मा वयाच्या 26 व्या वर्षी वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग आहे. टी20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 187.24 च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. टी20 क्रमवारीत 931 रेटिग पॉइंट मिळवणारा खेळाडू आहे. इतकंच काय तर टी20 क्रिकेटमध्ये नंबर 1 पोझिशन मिळवणारा युवा खेळाडू आहे. आशिया कप स्पर्धेत प्लेयर ऑफ द सीरिज राहिला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 135 धावा करणारा खेळाडू आहे. इतकंच काय तर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनिंग करून गोलंदाजीत 17 धावा देत 3 विकेट काढले आहे. भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असून 14 चेंडूत ही कामगिरी केली. अभिषेक शर्माने कमी चेंडूत 100 षटकार मारले आहेत. टी20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला.

Follow Us
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...