
मेलबर्न: तमाम क्रिकेट चाहत्यांना ज्या सामन्याची प्रतिक्षा होती, तो सुरु झालाय. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (MCG) प्रेक्षकांनी खच्चून भरलय. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने आले आहेत. या मॅचपासूनच दोन्ही टीम्स टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) मधील आपलं अभियान सुरु करणार आहेत. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे.
टीम इंडियाने या मॅचसाठी आपली सर्वश्रेष्ठ प्लेइंग 11 निवडली आहे. मेलबर्न स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी 1 लाख प्रेक्षक उपस्थित आहेत. भारतीय टीममध्ये एका अनुभवी खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
रोहित शर्मा टीम इंडियाच नेतृत्व करतोय. या मॅचसाठी रोहित-द्रविड जोडीने युजवेंद्र चहलला बाहेर बसवलं आहे. त्याच्याजागी रविचंद्रन अश्विनचा टीममध्ये समावेश केलाय.
अश्विनला का स्थान दिलं?
रविचंद्रन अश्विनला टीममध्ये स्थान मिळण्यााच एक कारण त्याचा अनुभव आहेच. पण त्याचवेळी पाकिस्तानच्या कमजोरीमुळे सुद्धा त्याला टीम इंडियात स्थान मिळालय. पाकिस्तानची बॅटिंग लाइनअप यावर्षी ऑफ स्पिनर्सचा सहजतेने सामना करु शकलेली नाही. ऑफ स्पिन गोलंदाजी खेळताना पाकिस्तानी टीम वारंवार अडचणीच आली आहे.
बाबर आजम असो वा मोहम्मह रिजवान त्यांना सुद्धा ऑफ स्पिन गोलंदाजी खेळताना अडचण आलीय. त्यामुळे रविचंद्रन अश्विनला टीममध्ये स्थान मिळालय.
रिजवान-बाबर कसे आऊट झाले?
मोहम्मद रिजवान ऑफ स्पिनरला खेळताना 3 वेळा आऊट झालाय. त्याचा स्ट्राइक रेट 112.32 आहे. बाबर आजम 35 चेंडूत 4 वेळा ऑफ स्पिनरला आऊट झालाय. त्याचा स्ट्राइक रेट 114.28 आहे. याच कारणामुळे अश्विनला टीममध्ये स्थान मिळालय.
टीम इंडियाची प्लेइंग इलेवन
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह