WI vs IND 3rd T20I | विंडिजने टॉस जिंकला, टीम इंडियात मोठे बदल

West Indies vs India 3rd T20I | वेस्ट इंडिज 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.

WI vs IND 3rd T20I | विंडिजने टॉस जिंकला, टीम इंडियात मोठे बदल
| Updated on: Aug 08, 2023 | 8:10 PM

गयाना | वेस्ट इंडिजने टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोवमेन पॉवेल याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिज या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे विंडिजला या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असा सामना आहे. या महत्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेईंग इलेव्हनमध्ये 2 मोठे बदल केले आहेत.

कुलदीप यादव याची एन्ट्री

कॅप्टन हार्दिक पंड्याने प्लेईंग इलेव्हनमधून विकेटकीपर ईशान किशन याचा पत्ता कट केला आहे. तर कुलदीप यादव फीट झाल्याने त्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे रवी बिश्नोई याला बाहेर पडावं लागलंय. कुलदीप यादव याला दुसऱ्या सामन्याआधी नेट्समध्ये सरावादरम्यना अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे कुलदीपला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यामुळे कुलदीपच्या जागी रवीला संधी मिळाली होती. मात्र आता कुलदीपने दुखापतीतून फीट होत कमबॅक केलंय.

प्लेईंग इलेव्हनमध्ये 2 बदल

यशस्वी जयस्वाल याचं पदार्पण

तर यशस्वी जयस्वाल याने टी 20 डेब्यू केलं आहे. बीसीसीआयने यशस्वी जयस्वाल याच्या टी 20 डेब्यूबाबत ट्विट करत त्याचं अभिनंदन केलंय. यशस्वीने याआधी विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केलं होतं.

टीम इंडियासाठी शेवटची संधी

दरम्यान टीम इंडियासाठी मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी तिसरा सामना हा जिंकणं बंधनकारक आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे.

वेस्ट इंडिज प्लेईंग इलेव्हन | रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, कायल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ आणि ओबेद मॅककॉय.

टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार.