WI vs IND Odi Series | टेस्ट सीरिजनंतर आता एकदिवसीय मालिका रंगणार, सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

West Indies vs Team India Odi Series | विंडिजला कसोटी मालिकेत 1-0 ने पराभूत केल्यानंतर टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे.

WI vs IND Odi Series | टेस्ट सीरिजनंतर आता एकदिवसीय मालिका रंगणार, सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?
प्रातिनिधक फोटो
| Updated on: Jul 25, 2023 | 11:13 PM

त्रिनिदाद | वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया उभयसंघातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा पावसामुळे अनिर्णित राहिला. टीम इंडियाने यासह कसोटी मालिका 1-0 ने जिंकली. टीम इंडियाचा विंडिज विरुद्धच्या हा सलग नववा कसोटी मालिका विजय ठरला. टीम इंडियाला विंडिजला 2-0 ने व्हाईटवॉश देण्याची संधी होती. मात्र पावसाने विंडिजची लाज राखली. तर टीम इंडियाचं स्वप्न भंगलं. आता कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेतील पहिले 2 सामने हे बारबाडोसमध्ये खेळवण्यात येतील. तर तिसरा आणि अंतिम सामना हा त्रिनिदाद इथे पार पडणार आहे. या वनडे सामन्यांना केव्हा सुरुवात होणार, केव्हा आणि कुठे पाहता येणार हे आपण जाणून घेऊयात.

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना केव्हा?

विंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना हा 27 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिल्या वनेड सामना कुठे आयोजित करण्यात आला आहे?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना हा केनिंग्सटन ओव्हल बारबाडोस इथे खेळवण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिल्या वनडे सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया पहिल्या वनडे सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

विंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला सामना हा टीव्हीवर डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया डिजीटल स्ट्रीमिंगचं काय?

वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला वनडे सामना हा मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहता येईल. तसेच फॅनकोड एपवरही सामना पाहता येईल.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मुकेश कुमार.

टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजाठी वेस्ट इंडिज संघ | शाई होप (कॅप्टन), रोवमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक एथनेज, यानिक कॅरिया, कीसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशेन थॉमस.