AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषभ पंत खेळणार की नाही? वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच बसला धक्का, झालं असं की..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला वनडे सामना वडोदरामध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वीच ऋषभ पंतला धक्का बसला आहे. कारण सरावादरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मालिकेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

ऋषभ पंत खेळणार की नाही? वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच बसला धक्का, झालं असं की..
ऋषभ पंत खेळणार की नाही? वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वीच बसला धक्का, झालं असं की..Image Credit source: PTI
| Updated on: Jan 10, 2026 | 5:54 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी वडोदरामध्ये होत आहे. त्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण या सरावात एक चिंता वाढवणारी घटना घडली आहे. स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला याला सरावादरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. रिपोर्टनुसार, थ्रो डाउन स्पेशालिस्टसोबत सराव करताना त्याला ही दुखापत झाली. फलंदाजी करताना त्याच्या कमरेच्या वर चेंडू लागला. वेदना असह्य झाल्याने त्याने मैदान सोडलं आणि तंबूत गेला. दुखापत होण्यापूर्वी ऋषभ पंतने जवळपास 50 मिनिटं सराव केला होता. आक्रमकपणे तो प्रत्येक चेंडू फटकावत होता. पण एका चेंडुने त्याला गंभीर दुखापत झाली आणि मैदान सोडावं लागलं.

ऋषभ पंतला झालेली दुखापत किती गंभीर? हे मात्र कळू शकलेलं नाही. त्याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. पण संघ व्यवस्थापक या स्थितीवर नजर ठेवून आहेत. मालिकेच्या सुरु होण्याच्या एक दिवस आधी ही दुखापत झाल्याने चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. कारण ऋषभ पंत फिटनेस आणि फॉर्मला एक दिवस आधी अंतिम स्वरूप देत होता. त्याचवेळी हा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत आणि दुखापत याचं घट्ट नातं जमलं आहे. त्यामुळे संघाच्या आत बाहेर असतो. असंच जर सुरू राहिलं तर भविष्यात त्याला संघात स्थान मिळवणं कठीण होऊ शकतं.

ऋषभ पंत टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला दुखापत झाली आणि संघाबाहेर गेला तर त्याची जागा दुसरा विकेटकीपर घेईल. सध्या संघात दुसरा विकेटकीपर म्हणून केएल राहुलचा पर्याय आहे. दरम्यान, ऋषभ पंतला टी20 वर्ल्डकप संघातूनही डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आता वनडे आणि कसोटी सामन्यावर भर देणं भाग आहे. त्याची दुखापत गंभीर नसावी अशी प्रार्थना आता त्याचे चाहते करत आहेत. मालिकेतील पहिलाच सामना वडोदरामध्ये होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...