WPL 2023 : दिल्लीचा विजयरथ कायम, यूपी वॉरिअर्सला 12 धावांनी चारली पराभवाची धूळ

कर्णधार मेग लॅनिंगने आक्रमक अर्धशतक आणि जेस जोनासेनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्लीने सामना खिशात घातला.

WPL 2023 : दिल्लीचा विजयरथ कायम, यूपी वॉरिअर्सला 12 धावांनी चारली पराभवाची धूळ
Harish Malusare | Updated on: Mar 07, 2023 | 11:42 PM

मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यामधील सामन्यात यूपी संघाचा पराभव झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या 212 धावांचा पाठलाग करताना यूपी संघाला निर्धारित 20 षटकात 169 धावाच करता आल्या. त्यामुळे दिल्लीच्या संघाने 42 धावांनी विजय मिळवत यूपी वॉरिअर्स संघाचा पराभव केलाय. कर्णधार मेग लॅनिंगने आक्रमक अर्धशतक आणि जेस जोनासेनच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर दिल्लीने सामना खिशात घातला. या विजयासह दिल्लीने सलग दुसरा सामना खिशात घातला आहे.

दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना यूपीच्या ताहिला मॅकग्राथ सोडता इतर कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. ताहिला मॅकग्राथ हिने नाबाद 90 धावांची खेळी केली, यामध्ये तिने 11 चौकार आणि 4 षटकार मारले. कर्णधार अलीसा हिली 24 धावा, श्वेता सेहरावत 1 धाव, किरण नवगिरे 2 धावा, दीप्ती शर्मा 12 धावा आणि देविका वैद्य 23 धावा यांनी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. दिल्लीकडून जेस जोनासेन सर्वाधिक 3 बळी घेतले आणि सामनावीरचा पुरस्कार पटकावला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाची सलामीवीर कर्णधार मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा यांनी जबरदस्त सुरूवात केली. मेग लॅनिंगने बॅक टु बॅक फिफ्टी केली. 42 चेंडूत तिने 70 धावा केल्या असून यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकार मारले. शफालीला मोठी खेळी करता आली नाही, अवघ्या 17 धावांवर ती परतली.

मरिझेन काप्प आणि एलिस कॅपसे यांनी अनुक्रमे 16 आणि 21 धाव केल्या आणि बाद झाल्या. जेमिमा आणि जेस जोनासेन यांनी मोर्चा हाती घेतला आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. जेमिमा रॉड्रिग्सने 34 धावा आणि जेस जोनासेनने 42 धावा केल्या.

दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, मरिझेन काप्प, जेमिमा रॉड्रिग्स, एलिस कॅपसे, जेस जोनासेन, तानिया भाटिया, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, राधा यादव, तारा नोर्रिस

युपी वॉरियर्स : अलीसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, ताहिला मॅकग्राथ, दीप्ती शर्मा, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्सलस्टोन, शबनिम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us